
मागील अनेक वर्षांपासून रंगपंचमीच्या दिवशी सणाच्या निमित्ताने समुद्राकडे जाणाऱ्या नागरिकांची गावातील रस्त्यावरून हुल्लडबाजी होत असते. नशा करून आणि वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून अति वेगाने वाहन चालविल्यामुळे यादिवशी अनेक अपघात घडत होते. तसेच तीन वर्षापूर्वी अश्याच हुल्लडबाज नागरिकांकडून वाघोली गावात पोलिसांना देखील जबर मारहाण झाली होती.
म्हणूनच आम्ही मागील दोन वर्षांपासून आमच्या गावांमध्ये रंगपंचमीच्या दिवशी विशेष पोलीस बंदोबस्त मागून या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत असतो.
मागील वर्षी फक्त वाघोली नाका येथेच 200 पेक्षा जास्त हुल्लडबाजी करणार्यांवर कारवाई केली होती.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विशेष पोलीस बंदोबस्त असावा म्हणून वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर सुभाष वर्तक यांनी मा. अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांच्याशी चर्चा करून रंगपंचमीच्या दिवशी अपघात तसेच काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त असावा (विशेष करून कळंब व भुईगाव येथे जाणाऱ्या रस्त्यांवर) म्हणून पत्र दिले आहे.
