भाजपा जैन प्रकोष्ठ व आनंद दर्शन युवा मंच तर्फे बिबवेवाडी येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

पुणे : “रक्तदान ही काळाची गरज असून, समाजातील प्रत्येक व्यक्तीने या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा. रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक जीव धोक्यात येतात, त्यामुळे समाजसेवेच्या भावनेतून पुढे येऊन रक्तदान करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केले.

पुण्यातील बिबवेवाडी येथील पुष्पमंगल चौक, पुष्पा हाइट येथे भाजपा जैन प्रकोष्ठ व आनंद दर्शन युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरादरम्यान २३८ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले, तर सुमारे २०० नागरिकांनी आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड याचा लाभ घेतला. या निमित्ताने समाजसेवा आणि जनजागृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जीतो अपेक्स चेअरमन विजय भंडारी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आमदार सुनील कांबळे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेविका मानसी देशपांडे, तसेच विजयकांत कोठारी, बाळासाहेब ओसवाल, मनोज देशपांडे, राजश्री शिळीमकर, पोपटशेठ ओस्तवाल, इंदर छाजेड, अनिल भन्साळी, एकता भन्साळी, माणिक दुगड, किर्तीराज दुगड, विजय भटेवरा, मनोज छाजेड, ललित शिंगवी, दिलीप कटारिया, रवी दुगड, बाळासाहेब धोका आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराचे आयोजन भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी आणि पुणे शहराध्यक्ष महेंद्र सुंदेचा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संदीप भंडारी यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र सुंदेचा यांनी केले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रकाश बोरा, अभिजीत शहा, जिनेंद्र कावेडिया, आनंद गादिया, सौरभ धोका, पंकज बाफना, उमेदमल धोका, महेश खिवंसरा व इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या उपक्रमाने पुण्यातील जनतेसमोर राजकारणासोबत सामाजिक जबाबदारीचेही उदाहरण ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *