
नालासोपारा (एस.रहमान शेख) : लॉक डाउनमुळे वाढत्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे लोकांना सध्या घरी राहावे लागत आहे. तसेच में महिना कडक उन्हाळा असल्याने आधीच लोक हैराण झालेले आहेत. दिवसा पेक्षा रात्रीचा उकाडा असहाय्य होत असताना वसई विरार मध्ये विजेचा लपंडाव सुरू झालेला आहे. मुस्लिम समाज यांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाल्यानंतर लोकांना त्रास असहाय्य करणारा आहे. स्थानिक समाजसेवक यांनी नालासोपारा पूर्व लक्ष्मी नगर येथे महावितरणच्या कार्यालयात विचारपूस करण्यासाठी गेले असता तेथील कर्मचारी यांनी सांगितले सध्या काम सुरू आहे असे उत्तर देण्यात आले,तेथील समाजसेवक यांनी कर्मचारी यांच्या निदर्शनात आणून दिले की रमजान महिन्यात लोक उपवास ठेवत असतात असे वारंवार वीज कपात केल्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तसेच आपण विजेचा दुरुस्ती कामाचा काही पूर्व सूचना न देता तुम्ही जनतेस वेठीस धरत आहात, वीज ग्राहक यांना सार्वजनिक मोबाईल द्वारे सूचना देण्यात यावे.