
नालासोपारा पूर्व | विशेष प्रतिनिधी

नालासोपारा पूर्वेतील रहमतनगर येथे आयोजित इफ्तार कार्यक्रमानंतर निलेश देशमुख यांनी परिसराचा दौरा करत नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रभाग ९ चे नगरसेवक व माजी सभापती असलेल्या देशमुख यांनी कोणत्याही औपचारिक बैठकीऐवजी थेट रस्त्यावर बसून स्थानिकांशी चर्चा केली.
दौऱ्यावेळी वरिष्ठ पत्रकार व समाजसेवक शमीम अहमद शेख, पत्रकार बंधू वसीम अहमद शेख अखिल भारतीय जनहित सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रफीक अन्सारी, काँग्रेस वसई-विरार जिल्हा समितीचे युवा उपाध्यक्ष संदीप कनौजिया, बहुजन विकास आघाडीचे नेते अमजद अली समानी उर्फ गुड्ड, युवा समाजसेवक हसनैन अन्सारी यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शॉल परिधान करून देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
रहमतनगरमधील नागरिकांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून प्रभागातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्याची त्यांची इच्छा होती; मात्र व्यस्तता व आरोग्य कारणांमुळे भेट होऊ शकली नव्हती. इफ्तारनंतर अचानक झालेल्या या भेटीत देशमुख यांनी प्रत्येकाशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.
“कार्यालयात बसण्यापेक्षा थेट जनतेमध्ये येऊन प्रश्न ऐकणारा नेता दुर्मिळ आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. प्रभाग ९ मधील मतदारांनीही आपल्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट देऊन विचारपूस केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
रहमतनगरमधील हा जनसंवाद सध्या चर्चेचा विषय ठरला असून, भविष्यातही अशा पद्धतीने थेट लोकांशी संवाद सुरू ठेवावा, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
