
प्रतिनिधी :
पालघर जिल्हा अंतर्गत वसईतील राजावली वाघरालपाडा येथे दरड कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले. सदर प्रकरणात महानगरपालिका, महसूल, पोलीस असे सर्वच अधिकारी जबाबदार असून सर्वांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत.
या बाबतची अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील वसईच्या राजावली वाघराल पाडा येथे दरड कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समितीचे जी कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त नीलम निजाई यांनी सदर प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जागा मालक, बांधकामधारक व नमूद जागेच्या मालकी हक्काचे हस्तांतरण करणारे मध्यस्थी इसम (नाव माहीत नाही) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणात महानगरपालिका अधिकारी, महसूल विभाग अधिकारी, पोलीस अधिकारी, मंत्रालयापर्यंत संबंधित सर्व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत. सदर ठिकाणी अनधिकृत बांधकामे झालीच नसती तर हा दुर्दैवी अपघात होऊन दोघांचा बळी गेलाच नसता. लाच खाउन अधिकारी अनधिकृत बांधकामांना संरक्षण देतात. आणि हो सर्वात अधिक जबाबदारी कोणाची असेल तर ती संबंधित मंत्र्यांची व मुख्यमंत्र्यांची. मंत्रालयाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे होतात यात शंका नाही. अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळालेच नसते तर बांधकामे झालीच नसती आणि हकनाक बळी गेले नसते.
प्र. सह आयुक्त नीलम निजाई यांनी मेरी फेलिक्स या मृत महिलेवर गुन्हा दाखल केला या मृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन प्र. सह आयुक्त कोणाला वाचविण्याचे काम करत आहे.सर्वे नं: १४६/१ च्या 7/12 वर ६० नावं आहेत. मग मृत महीलेवरच गुन्हा का दाखल?
हा पण प्रश्न उपस्थित होत आहे
गुन्हा दाखल केलेली महिला मेरी फेलिक्स ग्रेशिस २००९ मध्येच मयत आहे, एका युट्युब च्या चॅनेलमध्ये मेरी फेलिक्स ग्रेशिसच्या नातेवाईकांने सांगितल हि कौटुंबिक सामायिक जागा आहे त्याचे जागा वाटपसाठी कोर्टात प्रकरण सुरु आहे. जागा मालकाच्या नातेवाईकांने या अवैध बांधकाम संदर्भात तक्रार अर्ज केले मात्र प्रशासन कारवाई करण्याऐवजी यांना उलट प्रश्न करत होते. त्या भागात माती उत्खनन माती भराव होत असतानाच या लोकांवर वेळेवर कारवाई केली असती तर आज हा प्रकार घडला नसता.