
प्रभारी साह. आयुक्त दयानंद मानकर यांनी अपंगांची टपरी तोडून दाखवली मर्दुमकी
आयुक्त साहेब हे योग्य आहे का ?
वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त हे आता अपंगां बाबत किती भाव शून्य आहेत त्याचं उदाहरण वालीव प्रभाग समिती जी मधील अपंग बांधवांसाठी उभारलेली टपरी तोडून त्यांनी दाखवून दिल आहे. वालीव प्रभाग समिती जी चे प्रभारी साह आयुक्त दयानंद मानकर यांनी राजकीय दबावाखाली अपंगांसाठी बनवलेली टपरी कुठलीही लेखी आदेश व नोटीस न बजावता तात्काळ तोडून टाकली याचा अपंग जनशक्ती चे अध्यक्ष देविदास केंगार यांनी जाहीर निषेध केला असून हा अपंगांवरती केलेला अन्याय व सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. राजकीय दबाव पोटी ही कारवाई केली असल्याचे देविदास केंगार यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे प्रभाग समिती जी मध्ये लाखो चौरस फुटांच्या विविध बांधकाम सुरू असताना देखील आमच्यासारखे अपंगांच्या कल्याणासाठी बांधलेली टपरी तुटावी ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
दिव्यांगांच्या उदरनिर्वासाठी व कल्याणासाठी शासन सर्वप्रथम मदत करत असते .परंतु महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांना अपंगांना बद्दल किती अनास्था आहे हे या आजच्या कार्यातून दिसून आल. आहे वालीव प्रभाग समिती जी मध्ये धुमाळ नगर ,राजीवली, वाघराळ पाडा, चिंचोटी , कामंन या परिसरात अनधिकृत चाळी ,टपऱ्या, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे असे अंदाजे 50 लाख ते एक करोड चौरस फुटांचे अवैध बांधकाम सुरू असताना फक्त मानकर यांना अपंगांसाठी बांधलेली टपरीत दिसावी हा दहावा आश्चर्य म्हणावे लागेल. एवढी टपरी तोडण्यासाठी कार्य तत्परता प्रभारी साह आयुक्त दयानंद मानकर यांच्याकडे आहे ही आनंद बाब आहे .परंतु तेवढीच तत्परता हजारो लाखो चौरस फुटांचे अवैध बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी वापरली असती तर कौतुक केलं असत .मात्र तसं ते करणार नाहीत .कारण त्यांच्याकडून त्यांनी लक्ष्मी दर्शन घेऊन आपली पेट पूजा केल्याचं पुढे येत आहे. आठ दिवसात जर माझी टपरी पुन्हा बांधून दिली नाही व धुमाळ नगर, चिंचोटी, राजवली ,वाघराळपाडा, कामन, इत्यादी ठिकाणी जी लाखो चौरस फुटांचे अवैध बांधकाम वर कारवाई न केल्यास आपण ती बांधकाम तुटेपर्यंत सर्व अपंग बंधू-भगिनींसह प्रभाग समिती जी वालिव समोर बे मुदत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे अपंग जनशक्तीचे अध्यक्ष देविदास केंगार यांनी म्हटलं आहे. याबाबत आपण राज्याच्या मुख्यमंत्री गृहमंत्री तसेच अपंग कल्याण मंत्री यांच्याकडे स्वतः जाऊन तक्रार करणार असल्याचे देविदास केंगार यांनी म्हटल आहे