
पुणे प्रतिनिधी

पुणे येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल यांच्या वतीने डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) या विषयावर भव्य मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, यामधून तब्बल २२० हून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात आयोजक जितेंद्र कांचानी व समन्वयक किशोर चंदावरकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून केले. जितेंद्र कांचानी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारतीय शिक्षणक्षेत्रातील दोन महान नेते महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून केली. त्यांनी महात्मा फुलेंच्या संदेशाची सर्वांना माहिती दिली.
यानंतर प्रमुख पाहुणे हेमंत रासने (आमदार, पुणे) व न्यायमूर्ती (निवृत्त) चंद्रकांत गड्डम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आयोजक समितीतील सदस्य राजेश उपरपल्ली, गणेश विधे, जयकुमार भैरी, लक्ष्मी कोंडा, रविंद्र उद्दाटा, डॉ. परिक्षित महाले, डॉ. विशाल मेश्राम, डॉ. विदुला मेश्राम, प्रा. यशवंत इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
जितेंद्र कांचानी यांनी आपल्या वक्तव्यात नमूद केले की, या कार्यशाळेसाठी एकही फ्लेक्स किंवा बॅनर वापरण्यात आलेला नाही,
अतिथी म्हणून बोलताना आमदार हेमंत रासने यांनी जितेंद्र कांचानी व त्यांच्या टीमचे तसेच VIT महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे आणि डीन यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी एसबीसी विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळांचे आयोजन होणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. त्यांनी जितेंद्र कांचानी यांची SBC 2% स्वतंत्र आरक्षण आंदोलनातील आघाडीची भूमिका विशेषतः गौरवली.
यानंतर कार्यशाळेतील प्रमुख वक्ते म्हणून VIT कॉलेजचे डॉ. परिक्षित महाले (डीन R&D), डॉ. विशाल मेश्राम, डॉ. विदुला मेश्राम आणि प्रा. यशवंत इंगळे यांची ओळख करून देण्यात आली.
डॉ. विदुला मेश्राम यांनी VIT कॉलेजची माहिती दिली. यानंतर डॉ. विशाल मेश्राम व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या टीमने आरोग्य, स्टॉक मार्केट, फसवणूक व्यवस्थापन अशा दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणाऱ्या ६ AI प्रकल्पांचे सादरीकरण केले.
कार्यशाळेतील प्रमुख सत्रात डॉ. परिक्षित महाले यांनी AI म्हणजे काय, कमजोर आणि बलवान AI मधील फरक, ML म्हणजे काय, तसेच AI+IoT चा उपयोग याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी अतिशय समर्पक उत्तरे दिली.
कार्यशाळेचा समारोप समन्वयक किशोर चंदावरकर यांच्या आभारप्रदर्शनाने झाला. विद्यार्थ्यांच्या अभिप्रायानुसार ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण झाली असून, अशा अनेक कार्यशाळा पुढेही आयोजित कराव्यात, अशी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त मागणी केली.
संपर्कासाठी:
जितेंद्र कांचानी — आयोजक
ई-मेल: jkanchani@gmail.com
फोन: 8408006344