

वार्ताहर – कोविड उपचार पद्धतीवर प्लाझ्माथेरपी चा वापर होऊ लागला तेव्हा प्लाझ्मादात्यांची गरज भासू लागली. नालासोपारा येथील साथिया ट्रस्ट ब्लड बँक येथे रितसर प्लाझ्मा बँक ची परवानगी मिळाल्यावर ब्लड बँक चे चेअरमन श्री विजय महाजन यांनी प्लाझ्मा दानाची चळवळ उभी करण्यासाठी जनजागृती केली व अशातच आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी प्लाझ्मादानाची इत्थंभूत माहिती मिळवून प्लाझ्मादानाकरीता पुढाकार घेऊन प्लाझ्मादानाची डबल हॅट्रीक साधणारा महाराष्ट्रातील पहिला प्लाझ्मा दाता ठरले.
पालघर जिल्हा कुपोषणाने ग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो अशातच या जिल्ह्यातील एक व्यक्ती सहा वेळा प्लाझ्मादान करत आहे याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी व प्लाझ्मादानाचा *ब्रँड अॅम्बेसेडर* म्हणून विचार व्हावा अशी मागणी विविध संस्था संघटनांनी उचलून धरली आहे. प्लाझ्मादानाची जनजागृती करून प्लाझ्मादाते पुढे यावेत यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्नशील रहावे असे मत आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केले.
अतिगंभीर कोविड रुग्णाच्या कोविड उपचाराकरीता कोविडमुक्त व्यक्तींनी पुढे येउन प्लाझ्मादान करावा असे आवाहन श्री विजय महाजन यांनी केले.
रुग्णमित्रांचे आधारस्तंभ मार्गदर्शक रुग्णमित्र स्व जितेंद्रजी तांडेल यांच्या पुण्यस्मरणार्थ हे प्लाझ्मादान राजेंद्रने समर्पित केले आहे असे मत रुग्णमित्र श्री विनोदजी साडविलकर यांनी व्यक्त केले.