
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मैत्री संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षणाचा शुभारंभ काल ३० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जनता केंद्र, तुळशी वाडि, मुंबई सेंट्रल या ठिकाणी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ.जी.जी.पारिख यांच्या हस्ते पार पडला. तर कार्यक्रमाची सुरुवात युसूफ मेहेर अली शाळेच्या विद्यार्थ्यांनी नी देशभक्तीपर गीते गाऊन केली.तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.निर्मला प्रभावळकर (माजी महापौर व माजी अध्यक्षा राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य) , डॉ.प्रविण निचत (अध्यक्ष होप फाऊंडेशन व आरोग्य दूत) ,मा.वर्षा विद्या विलास ( सरचिटणीस नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य) हे मान्यवर उपस्थित होते.तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, व प्रशिक्षणामध्ये सहभागी विद्यार्थी यांची उपस्थिती होती.यावेळी सर्वच मान्यवरांनी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची आवश्यकता असून या शिबीराच्या माध्यमातून नवोदित सामाजिक कार्यकर्ते घडतील हि अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव राजेश जाधव यांनी केले.तर कार्यक्रमाची प्रस्तावना महिला पदाधिकारी तेजस्विनी डोहाळे यांनी मांडली व आभार प्रदर्शन कपिल क्षिरसागर यांनी केले.या कार्यक्रमाला नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, युसूफ मेहेर अली सेंटर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चे विशेष सहकार्य लाभले.