राणेभाट गावपरीवारात भारताचा 72 वा स्वतंत्रदिनचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . बाल गोपाल, तरुणांचा तसेच ग्रामस्थांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वसईतील साहित्यिक व कवीवर्य श्री. सायमन मार्टिन व प्रख्यात उद्योजक व शैक्षणिक मार्गदर्शक श्री. अँन्डू लोपीस ( अॅन्डू सर) व गावप्रतीनिधी म्हणून श्री. डायगो परेरा उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची सुरूवात salvation army च्या बँन्ड पथकाने मार्च पासने सुरूवात करून मग पाहूण्याच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. आपल्या भाषणात श्री अॅन्डू सर म्हणाले की, अतिशय शिस्तबद्ध रीतीने कार्यक्रम चालू आहे व लहान मुलांची शिस्त वाखाणण्याजोगी आहे. आज समाजाने आर्थिक व शैक्षणिक प्रगती बरीच केली आहे पण व्यसनाधीनता ही आता समाज व्यवस्थातेसाठी चिंतीची बाब बनत चालली आहे. Occasional drinker चा special drinker कधी होतो ते कळत नाही आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत व होत आहेत. अनेक उच्चभ्रू व प्रतिष्ठित व्यक्तीही ह्यात आहेत ही खेदाची बाब आहे. मुलांवर संस्कार करताना ह्या व्यसनापासून सावध राहावे असे सांगितले.

वसईचे साहित्यिक व कवी श्री. सायमन मार्टिन ह्यानी गावपातळीवर स्तुत्य उपक्रम असल्याचे म्हटले. वसई ही चळवळी आहे. स्वातंत्र्यानंतरही अनेक आंदोलने उभी राहिली, ती केवळ अनिर्बंध विकासामुळे. आज पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळेच सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. सत्ताधार्याची सत्तपिपासूवृत्ती त्यास कारणीभूत आहे. वसईत अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत व भविष्यातही अश्याच समस्याचा सामना करावा लागणार आहे त्यासाठी भावीपिढीने सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री रॉबर्ट परेरा, मान्यवराचा परिचय व आभार प्रदर्शन श्री संदिप रॉड्रिग्ज ह्यानी केले. कार्यक्रमाचा शेवट खाऊवाटपाने झाला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावपरिवारातील सदस्यानी विशेषता बालगोपालानी चांगली मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *