

रविवार दिनांक :- 02/6/2024 रोजी जिल्हामध्यवर्ती कार्यालय नालासोपारा येथे, माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब तसेच युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या मान्यतेने तसेच युवक जिल्हाकार्याध्यक्ष विशाल शिर्के यांच्या शिफारीनुसार युवक जिल्हाध्यक्ष योगेश पेंदरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश करण्यात आले, किशोर सावंत यांची युवक जिल्हा सचिव व आकाश पाटील यांची 132 नालासोपारा विधानसभा उपाध्यक्ष तसेच रोहित परमार यांची 82 वार्ड अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय नागवेकर, जिल्हा सरचिटणीस हरीश कोटकर, जिल्हा संघटक सचिव राजू यादव, जिल्हा युवक कार्याध्यक्ष श्रीधर पाटील तसेच नालासोपारा विधानसभा युवक अध्यक्ष आरिफ खान व इतर बहुसंख्या कार्यकर्ते यांच्या उपस्थित नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा