नालासोपारा(राजेश चौकेकर): दि.२७ सप्टेंबर २० रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात येणाऱ्या काळात रक्ताची मोठी गरज भासू शकते. अशा परिस्थितीमध्ये कुणीही रुग्ण हा रक्त न मिळाल्यामुळे दगाऊ नये असा मानस ठेवून राष्ट्रवादी पदवीधर संघ पालघर जिल्ह्यात रक्तदान करण्याचे एक महाअभियान मा.सुनील पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष (राष्ट्रवादी पदवीधर संघ)मा.शिवाजी पाटील साहेब.प्रदेश उपाध्यक्ष (राष्ट्रवादी पदवीधर संघ) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी रक्तदान महाअभियान नालासोपारा येथे आयोजित करण्यात आले. या रक्तदान महाअभियानाला कोरोनाच्या महामारीत देखील रक्तदात्यांचा चांगला प्रकारे प्रतिसाद मिळाला.

सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मनोज म्हात्रे जिल्हाध्यक्ष ओ.बी.सी. सेल (वसई-विरार शहर जिल्हा)हेमंत कहार कार्याध्यक्ष ओ.बी.सी. सेल (वसई-विरार शहर जिल्हा)नितीन म्हात्रे वसई तालुका अध्यक्ष रा काँ. पा. वसई-विरार शहर जिल्हा विशेष सहकार्य महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश भारती राष्ट्रवादी कामगार युनियन, अध्यक्ष देवेंद्र शिरोडकर जिल्हा उपाध्यक्ष ओ.बी.सी. सेल (वसई-विरार शहर जिल्हा) राष्ट्रवादी कामगार युनियन पालघर जिल्हाध्यक्ष संदेश पवार राष्ट्रवादी कामगार युनियन पालघर जिल्हा उपाध्यक्ष राम सिसोदिया राष्ट्रवादी कामगार युनियन नालासोपारा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रितेश सोलंकी जिल्हा सचिव ओ.बी.सी.सेल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी(वसई-विरार शहर जिल्हा)मनोज पाटील सुरेंद्र भोईर श्री रवी यादव हरीश कोटकर राज जाधव आणि आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पदवीधर संघ पालघर जिल्हाध्यक्ष निलेश जोशी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *