
आज दि.2 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय नेते ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मविभूषण ,खासदार आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्हातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन मा जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीकसाहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपारा विधानसभा युवक अध्यक्ष सुनील बोत्रे व युवक जिल्हा संघटक सचिव संजय निंगवले ह्यांच्या नियोजनातून-कोकण निवास,विजय नगर ,नारिंगी रोड, विरार(पूर्व)येथे सायन ब्लड बँक यांच्या साह्याने करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेस मानवंदना करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला .कोविड नियमांचे पालन करत 79 रक्तदात्यांनी रक्तदान केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व फ्रंटल सेल चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते