
शेकडो कार्यकर्त्यांच्या उपास्थितीत राजश्री शाहू महाराज स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाचे औचित्य साधून तालुका जव्हार मेमन हॉल येथे राष्ट्रीय पँथर्स आघाडी व स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देशातील महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा व कार्यकर्ता मेळावा संपन्न करण्यात आला. यावेळी राजश्री शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतीदिना निमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी व पालघर जिल्हा प्रभारी यशवंतसिंह ठाकूर साहेब यांनी कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देशातील जनतेची हालत अतिशय खराब असून ,सरकार विरोधात बोलणाऱ्या लोकांवर इडीची कारवाई केली जाऊन दडप प्रक्रिया जोरात सुरू आहे. वाढत्या महागाई मुळे जनता मोडकळीस आली असून ,बेजार झाली आहे. या देशातील तमाम नागरिकांना अनेको हक्क आणि अधिकार संविधानाने बहाल केले असून , देशातील संविधानाचे मूल्य आणि तत्वे जोपासणे तसेच संविधानाचे संवर्धन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, शैक्षणिक आरक्षण , तसेच अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका व्याख्यातीका साहित्यिका विद्याताई भोरजारे यांनी आपल्या सुमधुर वक्तृत्वाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. व उपस्थित कार्यकर्त्यांचे मने जिंकली. देशातील अद्यावत परिस्थितीची व समस्यांची जाणीव करून देऊन आता देशात महापुरुषांच्या विचारांची जनक्रांती होणे किती गरजेचे आहे हे त्यांनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना पटवून दिले. सुप्रसिद्ध डॉक्टर संतोष संगारे यांनी आपल्या भाषणात तरुण वर्गाने भोंगा व पोंग्या नेत्यांकडे लक्ष न देता शिक्षणाकडे लक्ष देऊन आपली व आपल्या देशाची प्रगती साधावी. देशात होत असलेल्या बारीकसारीक घटनांवर लक्ष देणे त्याच बरोबर संविधानिक अधिकार व संविधांन समजून घेणे प्रत्येक नागरिकांचे अधिकार व नैतिक जबाबदारी आहे असे ते म्हणाले. काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते सिकंदर शेख यांनी देशाचे संविधान हे देशाचे सर्वश्रेष्ठ राष्ट्रग्रंथ असून सर्व धर्म आणि जाती समूहाला जोडून समस्त देशातील नागरिकांमध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय व्यवस्था प्रस्थापित करण्याचे काम या देशाचे संविधान करते. परिणामी देशाचे संविधान हे एससी एसटी ओबीसी भटक्या विमुक्तांचे व अल्पसंख्याक समाजाचे व देशाचे प्रगतीचे खरे स्तोत्र असून त्याचे संवर्धन व सन्मान देशातील प्रत्येक नागरिकांनी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अविश राऊत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना देशामध्ये पंतप्रधान व्ही पी सिंगचे सरकार असताना मंडळ आयोग लागू करण्यात आले त्यावेळी त्या मंडळ आयोगाच्या विरोधामध्ये कमंडल यात्रा काढणारे ओबीसीचे खरे हितचिंतक असू शकतात का? याचे आत्मचिंतन समस्त ओबीसी बांधवांनी करायला हवे असा प्रश्न उपस्थित करून बीजेपीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत असताना त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी ओबीसी आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारच्या आख्यारीत येत नसून सुप्रीम कोर्टच्या अख्यारीत येते असे वक्तव्य करणारे जेव्हा सत्तेतून बाहेर जातात तेव्हा राज्यातील सत्ताधारी महविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसी आरक्षण देण्याची मानसिकता नाही असे बोलून दाखवतात यामुळे प्रत्येक वेळेस ओबीसी आरक्षण संदर्भात भूमिका बदलणाऱ्या विषयी ओबीसी बांधवांनी विश्वासहर्ता किती दाखवावी याचा विचार ओबीसी बांधवांनीच करावा. ज्यावेळी देशांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होतो. त्या त्या वेळी देशात काही ना काही मुद्दे उपस्थित करून सदर विषयाला डायव्हर्ट केले जाते. आताही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा संबंध राज्यात जोर धरत असताना सदर विषयाला डायव्हर्ट करण्यासाठीच भोंग्याचा विषय उपस्थित केला जात आहे अशी नागरिकांमध्ये दाट शंका आहे. ज्या वेळी ओबीसी बांधवांच्या आरक्षणा संदर्भामध्ये आंदोलने होतात तेव्हा सर्व आंबेडकरी व बहुजन विचारांच्या संघटना रस्त्यावर उतरतात. त्या त्या वेळी ओबीसी बांधवांना याचा थांगपत्ताही नसतो की आमच्या हक्काची लढाई आतापर्यंत आंबेडकरी बहुजन विचारांचा संघटना रस्त्यावर उतरून लढत आहेत. परंतु आज पालघर जिल्ह्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत असताना ओबीसी बांधवांना आंबेडकरी संघटना आणि बहुजन संघटनेचा विसर पडलेला स्पष्टपणे दिसून येत असल्याची खंत व्यक्त करत असताना आंबेडकरवाद म्हणजे देशांमध्ये बहुजन समाजात जाऊन समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय व्यवस्था प्रस्थापित करणे तसेच सत्ता संपत्ती प्रतिष्ठा
आणि न्यायापासून वंचित असलेल्या शोषित पीडित वंचित समाजाला न्याय मिळवून देणे हीच खरी बहुजन विचारधारा आहे असे मी मानतो. परंतु देशात सध्या दलित मुस्लिम आणि आदिवासी समाजाची अतिशय दयनीय अवस्था असून,जातीय व्यवस्थेने काहूर माजला आहे. देशात सरकारी कंपन्या व उपक्रम प्रायव्हेट कंपन्यांना चालवण्यासाठी देऊन आरक्षण संपवण्याचे षडयंत्र या ठिकाणी होताना दिसत आहे. देशाचे विकास दराने नीचांक गाठले असून, प्रचंड माहागाई ,भ्रष्टाचार , बेरोजगारी , कुपोषण ,प्रदूषण वाढल्याने ,तसेच जीवनावश्यक वस्तू ,पेट्रोल डिझेल व तेलीय पदार्थांच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ झाल्याने जनता त्रस्त असून , अत्यंत दुःखी आहे. असे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ता सलीम पटेल, चिराग देसाई राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे वरिष्ठ कार्यकर्ते जगदीश राऊत , अरशद खान , रोहित चौधरी, भरत महाले , चंद्रसेन ठाकूर , मोहिनी जधाव , वसीम काझी , पालघर जिल्हा अध्यक्ष विनायक जाधव , जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कांबळे , जिल्हा संघटक लहानु डोबा ,महिला जिल्हा अध्यक्ष विद्याताई मोरे , जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र मोरे , उमेश कापसे व जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख ,विभाग प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.