
वसई (प्रतिनिधी)सर्व संघटनेच्या पदाधिकारांनी वसई किल्ला रोड सिद्धार्थ नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम अभिवादन केले वसई गाव येथील प्रांत कार्यालय जवळील शासकीय विश्राम गृह येथे दिनांक 1/1/2020 रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमात संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना संघटनेचे पद देण्यात आले त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यासाठी संघटनेचे मुख्य पदाधिकारी यांनी भविष्याच्या वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आले आणि संघटनेची महिती थोडक्यात सांगितले संघटनेला गाल बोट लागेल असे कृत्य करू नये आणि समाजसेवा ही ईश्वर सेवा असे आपल्या नवीन पदाधिकारी यांना सांगण्यात आले. तसेच संघटनेचे मान्यवर संस्थापक अध्यक्ष मा.शरद तिगोटे,महाराष्ट्र कार्यध्यक्ष मा. फिरोज खान महाराष्ट्र संघटक प्रमुख संजय पवार,महाराष्ट्र कामगार विभाग अध्यक्ष जितेंद्र शिरसाट महिलाध्यक्ष श्रद्धा मोरे , अल्पसंख्याक महिला अध्यक्ष शमीम फिरोज खान, महाराष्ट्र महिला संघटक मंदा वाघ हे उपस्थित होते सदरच्या कार्यक्रमात मा. ऍड सबा शेख यांची नियुक्ती युवती अध्यक्ष महाराष्ट्र पदी आणि मीना तांडेल यांची वसई शहर उपाध्यक्ष पदी मा आसिफ शेख यांची महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष पदी करण्यात आले.