

◆ कारवाई न झाल्यास मंगळवारपासून संघटनेचा उपोषणाचा इशारा ?
नालासोपारा(प्रतिनिधी)-शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख चव्हाण यांनी पंचवीस वर्षे जुने रिक्षाचालकां चे कार्यालय तोडून स्वतः जागा हडप करत अनधिकृत अनधिकृत बांधकाम केले आहे.सदरच्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करून चव्हाण यांच्या वर एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी वसई तालुका रिक्षाचालक-मालक सेनेने काल एका पत्रकार परिषदेत केली. तसेच सदरच्या बांधकमांवर कारवाई न झाल्यास संघटनेने उपोषणाचा इशारा दिला आहे.सदरचे गाळे तोडते वेळी तसेच बांधते वेळी रिक्षा संघटनेच्या कमिटीला व कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. सदर चे गाळे आम्ही शिरीष चव्हाण यांना बांधण्यास सांगितले नाही, आम्ही फक्त रिक्षा संघटनेचे कार्यालय तोडले होते तेवढेच बांधून परत द्यावे अशी आमची मागणी होती.मात्र शिरीष चव्हाण यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी गाळे बांधले असून रिक्षा संघटनेचा त्याची काडीमात्र संबंध नाही.त्यामुळे सदरच्या अनधिकृत बांधकामांवर
न झाल्यास मंगळवार पासून आम्ही उपोषणास बसणार आहोत अशी माहिती या पत्रकार परिषदेत दिली.
वसई तालुका रिक्षाचालक-मालक सेनेचे कार्यालय मागील पंचवीस वर्षापासून नालासोपारा पूर्वेकडे उड्डाण पुलाखाली,रेल्वे ट्रकलगत वीस बाय वीस चे जुने कार्यालय होते.या ठिकाणाहून रिक्षाचालकांच्या अनेक समस्या आंदोलने केली जायची. अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम देखील या कार्यालयातून केले जायचे. रिक्षाचालकांचा प्रत्येक प्रश्न या कार्यातून सोडायला जायचा. कोरोना काळात याठिकाणी वसई विरार महानगरपालिकेने गटार बांधण्याचे ठरविले. त्यावेळेस सदर कार्यालय अडचणीचे ठरत होते म्हणून ठेकेदाराने ते कार्यालय तोडून त्या ठिकाणी पुन्हा तसेच कार्यालय बनवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ती संधी साधून संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी सदर कार्यालय तोडून ठेकेदारा करवी त्याची तोडफोड करून त्या जागी ६ बेकायदेशीर गाळे बांधले.विशेष म्हणजे हे सर्व करताना रिक्षा संघटनेचे जुने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही.दरम्यान सदर चे सहा गाळे बांधल्यानंतर रिक्षा संघटनेचे पदाधिकारी शिरीष चव्हाण यांच्याकडे रिक्षा संघटनेचे कार्यालय कुठे आहे हे विचारण्यासाठी गेलो असता ‘रिक्षा संघटनेचे कार्यालय आता तुम्हाला मिळणार नाही ,हे माझे वैयक्तिक मालमत्ता आहे.मी माझे मीटर स्वतःच्या नावावर करुन घेतले आहेत.त्यामुळे तुम्हाला रिक्षाचालकांना यापुढे इथे कार्यालय मिळणार नाही. तुम्हाला जे काय करायचे ते करून घ्या.माझे वर पर्यंत राजकीय संबंध आहेत. माझं काहीही वाकडे होणार नाही’ असे सांगत त्या जागेवर मालकी हक्क सांगितला.
दुसरीकडे शिरीष चव्हाण यांनी संघटनेच्या नावाने बांधलेल्या त्या बेकायदेशीर गळ्यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर सुरू केला आहे.तसेच चव्हाण यांनी दुकाने भाड्याने देऊन त्यांच्याकडून लाख रुपये डिपॉझिट घेतले असून महिन्याला हजार रुपये वैयक्तिकरित्या भाड्याच्या रूपाने घेत आहेत.
सदरचे गाळे हे अनधिकृत असून त्यावर तोडक कारवाई करून शिरीष चव्हाण यांच्या वरती एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी संघटनेने महापालिकेकडे केली होती.परंतु अद्याप महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही.राजकीय दबावापोटी महानगरपालिकेचे अधिकारी शिरीष चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यास धजत नसल्याचा आरोप यावेळी संघटनेने केला आहे.संघटनेने यापूर्वी देखील महापालिकेला सदर अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यावेळी लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन देऊन संघटनेची बोळवण केली होती .त्यामुळे संघटनेने तत्कालीन प्रस्थावित उपोषण स्थगित केले होते. परंतु अद्यापही महानगरपालिकेने सदर बेकायदेशीर बांधकामावर तसेच शिरीष चव्हाण यांच्यावर कारवाई केली नाही.दरम्यान सदरचे गाळे सुटले नाही तर आम्ही सदर अनधिकृत बांधकाम समोर अथवा महापालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
