
प्रतिनिधी –
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नालासोपारा पूर्व येथे वसईतालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री शिरीष दादा चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते लक्ष्मी नगर येथील नवीन रिक्षा स्टॅन्ड सुरु करण्यात आले.
कोरोनामध्ये अनेक कामगार बेरोजगार झाले तर काहींना उपासमारीच्या वेळेचा सामना करावा लागला, रिक्षाचालक यांनाही या संघर्षातून जावे लागले. सरकारने मदतीचा हात पुढे केला पण त्याचा लाभ काही रिक्षाचालक यांना मिळाला. नालासोपारा मधील वाढती लोकसंख्या लक्षात घेता रिक्षा हे लगेच कोठेही उपलब्ध होण्याचे साधन मानले जाते. त्यांच्या हक्काचे स्थानक असावे म्हणून लक्ष्मी नगर येथील रिक्षाचालक एकत्र येऊन श्री शिरीष दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा स्थानक सुरु केले.
सरकारी नियमाचे पालण करणे, प्रवसी यांच्या सोबत चांगल्याप्रकारे संवाद करणे व योग्य तो मोबदला प्रवाश्यांकडून घेण्यात यावा तसेच प्रत्येक रिक्षाचालका करिता अपघात विमा व पेन्शन योजना सुरु करण्यात येणारअसून त्यासाठी शिरीष दादा चव्हाण साहेब पर्यन्त करीत आहेत. लक्ष्मी नगर येथील रिक्षा स्टॅन्ड उदघाट्न सोहळा प्रसंगी वसईतालुका रिक्षा चालक- मालक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री शिरीष दादा चव्हाण साहेब यांनी जाहीर केले. या प्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख श्री संजय कालेकर साहेब व रवींद्र रावणग साहेब शाखाप्रमुख अनिल आलीम साहेब, लक्ष्मी नगर रेशीडेन्ट असोसिएशन चे अध्यक्ष श्री अशोक चव्हाण, लक्ष्मी नगर रिक्षा स्थानक अध्यक्ष जनार्दन धयाळकर, उपाध्यक्ष – अशोक पडियार , सचिव संदिप कुळये, रोशन चव्हाण व लक्ष्मी नगर येथील सर्व रिक्षाचालक उपस्थित होते.