


आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय नेते मा.डॉ.राजेंद्र गवई साहेब यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार आज ते मुंबई वरून या बैठकीत सहभागी झाले..
देशात लॉकडाऊनच्या घोषणेनंतर राज्य सरकारने ताबडतोब सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची बैठक सुरुवातीला घ्यावी अशी सूचना मी तेव्हा केली होती. पण, ते तेव्हा शक्य झाले नाही.
संपुर्ण जगावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठं संकट उद्भवले आहे. या संकटकाळातून राज्याला बाहेर काढण्यासाठी व राज्याची आर्थिक स्थिती पूर्ववत करण्यासाठी काय उपाय योजना करता येतील? या संदर्भात चर्चा करण्यात आली. ही संकटाची वेळ आहे यातून राज्याला बाहेर काढणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज मा.मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतिने सरकारला काही विषयांवर सूचना केल्या आहेत. सरकार यावर लक्ष देऊन काम करेल ही अपेक्षा !
१. राज्य सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या जेवणाच्या योजनेत अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
२. राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे वाटप करावे, सरकारने कापूस खरेदी थांबवू नये, रब्बीचे पिक शेतकऱ्यांच्या घरात आहे. ते एपीएमसीने विकत घ्यावे.
3.रिक्षा, हातगाड्या, घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत ते पुनर्गठीत करावेत. मजुरांना कमीतकमी वेतन दिलेच पाहिजे ही मागणी आम्ही सरकारकडे केली.
ही सामूहिक लढाई आहे यात आम्ही सरकार बरोबर आहोत.
– डाॅ राजेंद्र गवई
राष्ट्रीय सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया