गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन तेथील जनजीवन विस्कळीत होऊन लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यातील पुराचा जास्त फटका कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला बसला असून तेथे फार मोठी जीवितहानी झाली आहे तसेच शेतीचे, गुरेढोरे, घरे व जिवनापयोगी वस्तू इत्यादी सर्व उध्वस्त झाले आहेत सदर पूरग्रस्तांना विविध संघटना पक्षाच्यावतीने मदत करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. रामदासजी आठवले साहेब (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत – सरकार) यांनीसुद्धा पूरग्रस्त भागांना भेटी देऊन सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला आपल्या खासदार निधीतून प्रत्येकी रुपये २५,००,०००/-पंचवीस लाख प्रमाणे एकूण निधी रुपये ५०,००,०००/-पन्नास लाख मदत म्हणुन निधी जाहीर केला आहे. तसेच सर्व कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आव्हान केले असताना पालघर जिल्ह्याच्या वतीने आम्ही ६०,००० टेबलेट्स म्हणजे औषधाचे पोकेट्स, १०००-हँडवॉश, १००-ब्लॅंकेट, १००-चादरी,छोटे-मोठे मोजे-१०००, टॉवेल -१००तसेच इत्यादी जीवनोपयोगी वस्तू मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली व लवकरात लवकर सदर जिवनापयोगी वस्तू पूरग्रस्तांकडे पोहचविण्याची मागणी करण्यात आली. सदर कामी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांसोबत मे. सफायर कॅप्सूल, ऐरोकेम लॅब, युनिबोइज लॅब, रेणूमेड मेडिकल, लिसेन टू. लॅब, फ्रेंडून फार्मा , कॉस्मिक इंडस्ट्रीज तसेच आमच्या पालघर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची मदत मिळाली आहे एकूण १लाख ६० हजार किमतीचे सामान आपण पालघर जिल्ह्याच्या वतीने मदत म्हणून मा. जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे सुपूर्द केले आहे सदर प्रसंगी आयु. सुरेश जाधव (जिल्हाध्यक्ष पालघर)सचिन लोखंडे (जिल्हा कार्याध्यक्ष पालघर) कुंदन मोरे( उपाध्यक्ष पालघर जिल्हा ) नवीन त्रीपाठी (उपाध्यक्ष पालघर जिल्हा) सोमनाथ धनगावकर (पालघर जिल्हा सरचिटणीस), श्यामराव खरात ( पालघर जिल्हा संघटक) जब्बार पटेल (जिल्हा संघटक पालघर) राजकुमार यादव (जिल्हा संघटक पालघर) नरेंद्र करणकाळे (पालघर तालुका अध्यक्ष) शरद जाधव (युवा अध्यक्ष पालघर तालुका) राम ठाकूर (पालघर शहर उपाध्यक्ष) जागृत जाधव ( युवा उपाध्यक्ष पालघर तालुका) सचिन घाडीगावकर (युवा संघटक पालघर शहर) उदय तांबे (ज्येष्ठ कार्यकर्ता पालघर) आशाताई दहाट (महिला आघाडी सचिव पालघर जिल्हा)राजू शेख (पालघर शहर संघटक) दीपेश गायकवाड( युवा कार्यकर्ता) गायत्री शर्मा (महिला कार्यकर्त्या) जयस्वाल (उद्योजक) जागृती तिवारी, निशा मॅडम, सायदा शेख(महिला कार्यकर्त्यां पालघर) संकेत वरठा( गिरणोळी शाखा-प्रमुख) कल्पेश पाटील (केळवे – रावळे शाखाप्रमुख) समिधा दुमाडा व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *