
रिपांइ चे तरुण तडफदार व्यक्तिमत्व व विधानसभा उप अध्यक्ष पदी असलेले मा. प्रेमसागर बा. इगवे यांचे शनिवारी रात्री 10.00 वा.घोडबंदर येथे अपघात झाला असुन त्यात ते थोडक्यात बचावले आहे. ठाण्यावरून ते रिक्षाने आपल्या मित्रासोबत घरी येत असताना ते ज्या रिक्षाने येत होते त्या रिक्षाचा भीषण अपघात झाला त्यात त्यांच्या छातीला दुखापत झाली असुन त्याच्या सोबत असलेले त्यांचे मिञ अनिकेत जाधव ह्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. रिक्षाचे खूप मोठे नुकसान झाले. त्यात जीवित हानी झाली नाही


