
कोरोणा वायरसच्या आपत्तिकाळात शासनाने २१ दिवसांची संचारबंदी घोषित केली असता ज्यांचे हातावर पोट आहे.अशा रोजंदारीवर जगणार्या व शासकिय जमिनिवर निवारा असल्यामुळे जे रेशनकार्ड धारक नाही त्यामुळे शासकिय रेशन नाही तसेच मतदार नसल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधिंचे दुर्लक्ष कोणतीही मदत न पोहचल्यामुळे अशा मजुरवस्तीत चिंतेचे सावट आहे! अशा वस्तीत रिपाई जिल्हाध्यक्ष गिरिश दिवाणजी ,नितिन उबाळे व आमचे सहकारि मित्र जोसेफ, मिंटो व आतिश यांनी मदतीचा खारिचा वाटा उचलुन विरार येथिल अशाच मजुरवस्तीत घरोघरी जाऊन अत्यावश्यक अन्नधान्याचे सामान वितरित करण्याचे निस्वार्थपणे केले. या कामी अण्णासाहेब वर्तक ट्रस्टचे जेष्ठ समाजसेवक व शिक्षण महर्षिं मा.विकास(बंधू)वर्तक यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.
“आज घरात रात्रि दिवा लाऊ वा न लाऊ पण गरीबाची निदान चुल तरि पेटवुया” हेच उद्दिष्ट ठेऊया!

