आज शनिवार दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. राजेंद्रन (माजी आमदार कर्नाटक)राष्ट्रीय नेते तथा सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई साहेब यांच्या आदेशानुसार जेष्ठ पत्रकार मन्सूर सरगुरोह यांची रिपब्लिकन पक्षाच्या पालघर जिल्हा प्रवक्तेपदी व वसई विरार महानगरक्षेत्र निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. अनेक वर्ष पत्रकारितेत त्यांचा दांडगा अनुभव आहे. अनेक वर्ष UAE मधील नावाजलेले “खलीज टाईम्समध्ये” तर काही वर्ष “टाइम्स ऑफ इंडियाच्या ठाणे पुरवणी” करता त्यांनी पत्रकारिता केली हाेती. सध्या ते स्वत: चे “कोकण सन” या नावाने इंग्रजी साप्ताहिक प्रकाशित करीत आहेत. त्यांच्या नियुक्तिमुळे रिपब्लिकन पक्षाला त्यांच्या अभ्यासू पत्रकारितेचा व अनुभवाचा फायदा होईल.असे नियुक्ती पत्र देताना पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी यांनी आपले मत मांडले. यावेळी पालघर जिल्हा युवाध्यक्ष शफीकुर रहमान शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *