

विरार पूर्वेकडील पापडखिंड धरण क्षेत्रातील पाणीपुरवठा हा जवळ असलेल्याफुलपाडा व जीवदानी रोड परीसरातील नागरी वस्तींना केला जात असून १एम.एल.डी. क्षमता असलेले धरणक्षेत्रातील पाणीपुरवठा येथील झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे अपुरा पडत असुन वर्षात ६ ते ७ महिने धरणक्षेत्रातून सद्यस्थितीत पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच येथे धार्मिक पूजेच्या वआस्थेच्या माध्यमातून सोडण्यात येणारे निर्माल्यातून हे धरण प्रदूषित होण्याच्या मार्गावर आहे.
महोदय या प्रदूषणाकडे वारंवार महानगरपालिका प्रशासनाचे आम्ही लक्ष वेधले असतानाही “धरणक्षेत्रात नागरिकांसह येण्यास मज्जाव “या भल्यामोठ्या फलका व्यतिरिक्त कोणतीहि सुरक्षाविषयक उपाययोजना केलेली नाही. आमचा धार्मिक अास्थेस विरोध नसून या माध्यमातून जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे होणारे प्रदूषणास आमचा विरोध आहे.
महोदय या अपुरा पाणीपुरवठा व जलप्रदूषणावर जर महानगरपालिका प्रशासनास तोडगा काढता येत नसेल तर सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पातल्या २३० एम.एल.डी. पाणीपुरवठ्यातून बाराही महिने फुलपाडा व जीवदानी रोड परीसरातील नागरिवस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात यावा.अशा प्रकारची विनंती दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय झालेल्या महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत रिपाइंच्या वतीने करण्यात आली होती. यावर मंत्रीमहोदयांनी आपल्यासमक्ष आयुक्त व रिपाइंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याचे सुचना दिल्या होत्या. परंतु सदर विषयांबरोबर इतर नागरी विषयांवर चर्चा करण्याकरिता आजपर्यंत वेळ मागत असताना आपला बहुमूल्य वेळ आजपर्यंत आमच्या शिष्टमंडळास मिळालेला नाही. नागरिसमस्यांबाबत चर्चा करण्याकरीता आम्हास भविष्यात अांदाेलनाच्या माध्यमाचा वापर करावा लागू नये याची दखल आपण घ्यावी असे लेखी निवेदनात गिरीश दिवानजी यानी सांगितले.