

पुणे – अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या मंचावर उपस्थित असणारे सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आज एकत्र आले होते. कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा किंवा स्नेहसंमेलन असल्याचे आनंददायी चित्र निर्माण झाले होते. निमित्त होते रुग्णहक्क परिषदेने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाचे! यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सामाजिक – राजकीय संघटना आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समारंभपूर्वक मानपत्र प्रदान करून जाहीर सत्कार करण्यात आला. रुग्णहक्क परिषदेने हा आगळावेगळा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते तब्बल एकशे अकरा सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, केंद्रीय सचिव दीपक पवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे, केंद्रीय सल्लागार प्राचार्य वृंदा हजारे, प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई चव्हाण उपस्थित होत्या.
युवक काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, स्वीकृत नगरसेविका अपर्णा कुर्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम मोरे, सामाजिक कार्यकर्त्या आरती घुले, काँग्रेस पक्षाच्या वैशाली लालसिंग परदेशी, रिपाईच्या हलीमाबी शेख, सामाजिक कार्यकर्त्या छायाताई कांबळे, वृषा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सारिका पारेख, रुग्ण हक्क परिषदेच्या यशस्विनी नवघणे, सुरेखा कुसाळकर, राहुल सलगर, माउली जाधव, महाराजत अर्बन बँकेच्या संचालक नम्रता पवार, रेश्मा केदारी, वसईचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे, रिपब्लिकन पक्षाचे विशाल धावारे, गोविंद साठे, बहुजन समाज पक्षाचे किशोर आढागळे, करणी सेनेच्या उषा राजपूत, शिवसेनेच्या भावना इंदलकर, बजरंग सेनेच्या प्रज्ञा इंगवले, रुग्ण हक्क परिषदेचे चांदभाई बळबट्टी, अल्ताफभाई तारकश, आसमा सय्यद, सामाजिक कार्यकर्ते खिसाल जाफरी, गायक अमर पुणेकर, लोककलावंत गणेश खंडागळे, अंकुर संस्थेच्या अनुप्रिता दीक्षित यांच्यासह सुमारे एकशे अकरा सत्कारमूर्ती सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी निवडक कार्यकर्त्यांनी सत्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त केले. शाल आणि मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या कोंतम यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी पुणे शहर अध्यक्ष विकास साठे, केंद्रीय कार्यालय उपसचिव गिरीश घाग, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठे यांनी विशेष परिश्रम घेतले.