प्रतिनिधी :
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रेम्डेसिवीर इंजेक्शनबाबत वसई विरार शहर महानगर पालिकेने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करून रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले जात असून सदर प्रकरणी बदर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रेम्डेसिवीर इंजेक्शन कोविड रुग्णालयातून मोफत देण्याबाबतचा आदेश मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी दि. २२/४/२०२१ रोजी काढला. सदर आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, कोविड सेंटरमध्ये दाखल कोविड रुग्णाला सदर रुग्णालयातून इंजेक्शन द्यायचे आहे. बाहेरून इंजेक्शन आणायला सांगितल्यास आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित रुग्णालयावर गुन्हा दाखल केला जाईल.
नालासोपारा पश्चिमेस नवायत मोहल्ला या ठिकाणी असलेल्या बदर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन आणावयास सांगून महानगरपालिकेच्या आदेशाचे खुल्ले उल्लंघन केले जात असून सदर प्रकरणी रुग्णालयावर कायदेशीर कारवाई व्हावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *