वसई : राज्य सरकारने 1 एप्रिलपासून रेशनिंग दुकानांत धान्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे धान्य घेण्यासाठी नागरिक रेशन दुकानांत गर्दी करत असून; नागरिकांच्या गर्दीमुळे वसई-कोळीवाड़ा गावात सामाजिक अंतराचे नियम मोडीत निघाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अन्नधान्य तुटवड़ा होऊ नये म्हणून राज्य सरकारने रेशनिंग दुकानांत धान्य उपलब्ध करून दिले आहे. 1 एप्रिलपासून हे धान्य उपलब्ध झाले असून; दुकानांवर गर्दी न करता नागरिकांना धान्य घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मात्र त्यानंतरही नागरिक रेशनिंग दुकानांवर गर्दी करत आहेत. वसई-कोळीवाडा येथील दुकानावरही असेच चित्र असून; सामाजिक अंतराचे सर्व नियम मोडीत निघाले आहेत.

दरम्यान; वसाईतील एकजूट महिला बचत गटाच्या दुकानात मात्र सामाजिक अंतराचे नियम कसोशीने पाळण्यात येत असल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

*बसिन कैथोलिक बँकेतही नियमांना हरताळ*

वसईतील बसिन कैथोलिक बँकेतही सामाजिक अंतराचे नियमांना हरताळ फासला गेल्याने बँकेत दिवसभर गर्दी पाहायला मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *