
वसई तहसीलदार कार्यालय पुरवठा विभागाकडून अनेक रेशन कार्ड नव्याने दिले जातात तसेच अनेक रेशनकार्ड विभक्त करून तसेच पत्ता व रेशनिंग दुकान बदलून दिले जातात
त्याप्रमाणे दिलेल्या रेशनकार्ड चे गेल्या चार ते पाच वर्षापासून आर सी नंबर ची नोंद आजपर्यंत न केल्यामुळे सबंधित रेशनकार्ड धारकाला धान्य रेशनिंग दुकानदार देत नाही.
आर सी नंबर देण्याची जबाबदारी कोणाची?
सबंधित रेशनकार्ड वरील धान्य पुरवठा विभागाकडून सबंधित दुकानदारांना येते का?
आजही लोकनेते फुकट धान्य रेशनकार्ड धारकाला देत आहे असे मॅसेज वॅटसप वर येत आहे.
रेशनिंग बाबत लोकनेते व त्याचे कार्यकर्ते रेशनिंग दुकान समोर रेशन वाटप करताना उभे आहेत.
आमच्या माहीती नुसार रेशनिंग दुकानदारांनी स्वतः पुरवठा विभागात चलन भरून धान्य आणले .आणी लोकनेते व त्याच्या कार्यकर्ते च्या आश्वासन नुसार रेशनदुकान मालक रेशनकार्ड धारकाला फुकट धान्य देत आहे अनेक रेशनदुकानदार खासगी, महीला बचत गट,तर काही सहकारी संस्था आहेत मग ह्यांना लोकनेते व त्याचे कार्यकर्ते हा खर्च कोणत्या माध्यमातून देणार? कोणत्या संस्थेतून देणार?त्याचे कार्यकर्ते संस्थेचे नाव का सांगत नाही?
वरील संस्था किंवा वैयक्तिक स्वरुपात धनादेश द्वारे यांजकडून आला तर ते रेशनदुकानदार नोंद करतील?
रोख स्वरूपात आला तर!!!!!
महाराष्ट्र शासनाने सर्व रेशन कार्ड धारकाला स्वस्त दरात धान्य देत आहे.
परंतु वसई पुरवठा विभाग व लोकनेते
हे खरोखरच सर्वाना धान्य देणार असतील तर अगोदरच पुरवठा विभागात चलन का भरले नाही
ज्याचे आर सी नंबर नोद नाही त्याना आजही रेशनिंग धान्य न देता परत पाठवत आहे त्या कार्ड धारकाचे धान्य नेमक्या कोणत्या कोठारात जमा होणार आहे?
गेल्या चार पाच वर्षापासून ज्या पोश मशीन वर थंब चालत नाही ही जबाबदारी नेमकी कोणाची? अश्या वेळेस पावती ने ही धान्य दिले आहे ते धान्य रेशनकार्ड धारकाकडे की दुकानदार कडे जमा होते?
तर काही कार्डधारक रेशनिंग दुकान दार वेळेवर धान्य न आणत असल्याने व वाटप वेळ निश्चित करीत नसल्याने धान्य मिळत नाही.
आता शासनाच स्वस्त धान्य फुकट देणारे लोकनेत्याने अश्या गोरगरिबांचे धान्य लुटमार करणारे पुरवठा दार व रेशनिंग दुकानदार यांची चौकशी करतील ? आर सी नंबर नोंद न करणारे व थंब न चालणारे पोश मशीन यांचे हात पुरवठा विभाग व रेशन दुकान मालक कर्मचारी पर्यत आहेत?
तालुका पुरवठा अधिकारी रोशन कापसे व लोकनेते रेशनकार्ड धारकाला न्याय देतील?