नालासोपारा ता. ९ (प्र.) आमदार क्षितीज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आ म्हणूनज येथे एका
रोजगार मेळाव्या यहचे आयोजन करण्यात आले होते.
श्री प्रस्थ वसाहतीतील बहुजन विकास भवन येथे झालेल्या या मेळाव्याला गरजू व नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींनी चांगला प्रतिसाद दिला.
राज्यातील नामांकित अशा कंपन्यांना आणि उद्योजकांना या मेळाव्यात सहभागी करून घेण्यात आले होते.
न्यू रोजगार गृपच्या वतीने आणि ब.वि.आ. पक्ष नालासोपारा विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम आज यशस्वीरित्या पार पडला.
उदघाटन सोहळ्यात माजी उपमहापौर उमेश नाईक तर समारोप प्रसंगी प्रथम महापौर व ज्येष्ठ कामगार नेते राजीव पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
युवा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता.या अत्यंत गरजेच्या उपक्रमात नेमक्या किती नोकऱ्या दिल्या गेल्या किंवा निश्चित करण्यात आल्या याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नसला तरी
किमान एक हजाराहून अधिक बेरोजगार रोजगार इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवला आहे.
,प्रभाग सभापती निलेश देशमुख, नगरसेवक किशोर ग.पाटील,माजी नगरसेवक मुनीर खान, नरेश जाधव, रमाकांत वाघचौडे, नगरसेविका शुभांगी गायकवाड, युवा विकास आघाडीचे पदाधिकारी पंकज देशमुख, नविन वाघचौडे,शेखर भोईर, नवनाथ पगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *