पालघर दि.२२ डिसेंबर २०१९ *डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या* पाठपुराव्याने *रोटरी क्लब पालघर व गोरेगाव* यांच्या तर्फे *पालघर* व *केळवे रोड* स्थानकात *दिव्यांग व आजारी* प्रवाशांच्या सुविधे साठी *व्हीलचेअर* चा छोटेखानी लोकार्पण सोहळा पालघर स्थानकात पार पडला. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सचिव श्री दयानंद पाटिल व सभासद श्री. हृदयनाथ म्हात्रे ह्यांनी रोटरी क्लब च्या सर्व उपस्थित पदाधिकार्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रोटरी क्लब पालघर चे अध्यक्ष श्री अमित पाटिल व रोटरी क्लब गोरेगाव पश्चिम चे अध्यक्ष श्री सुनिल किनारीवाला ह्यांच्या हस्ते व्हिल चेअर चे लोकार्पण करण्यात आले.
“रोटरी क्लब नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असते.
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या विनंतीला मान देऊन रोटरी क्लबने हि सुविधा उपलब्ध करून दिली.” असे म्हणून डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या पालघर स्टेशन कमिटीचे अध्यक्ष श्री प्रतिक पाटिल ह्यांनी रोटरी क्लबचे विशेष आभार मानले तसेच उपस्थितांनाही धन्यवाद दिले.
ह्या प्रसंगी रोटरी क्लब चे सचिव श्री.प्रशांत पाटिल तसेच श्री. गणेश घूगे, रफिक लुलानीया, मिनल शहा , रफिक धडा व हेमंत वारीया हे रोटरीक्लब चे सदस्य तसेच पालघरचे स्टेशन अधिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *