
मंडळाधिकारी शशिकांत पडवळे तलाठी विलास करे पाटील
प्रतिनिधी :
अंदाजे लाखांची तोड करणारे वसईचे मंडळ अधिकारी लाचखोर शशिकांत पडवळे, ससूनवघरचे तलाठी विलास धर्मा करे पाटील व खाजगी इसम दलाल प्रवीण माळी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सदर यशस्वी सापळा कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक सौ. अश्विनी संतोष पाटील, सपोफौ. सोंडकर, पोहवा. महाडिक, पोना. पाटील, मपोना शिंदे, चापोहवा. कदम यांच्या पथकाने केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, फेरफार नोंद करण्याकरिता वसईचे मंडळ अधिकारी लाचखोर शशिकांत पडवळे, ससू नवघरचे तलाठी विलास धर्मा करे पाटील यांनी तक्रारदाराकडे १,२०,०००/- लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ७०,०००/- रुपयांचा व्यवहार ठरला. त्यापैकी ४५,००० रुपये रक्कम स्वीकारताना वरील आरोपींसह एक खाजगी इसम प्रवीण छबुलाल माळी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि. २१/१२/२०२१ रोजी रंगेहात अटक केली.
फेरफार करण्याकरिता मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे, विलास धर्मा करे पाटील लाखो रुपये लाच घ्यायचे. शेवटी त्यांच्या पापाचा घडा भरला. प्रत्येक शासकीय अधिकारी हा १००% लाचखोर आहे, यात अजिबात शंका नाही. मात्र लाच घेताना हे लोक सहजासहजी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकत नाहीत. कारण फार कमी लोक तक्रार करतात.
शशिकांत पडवळे यांचे वरीष्ठ नायब तहसीलदार प्रदीप मुकणे, तहसीलदार उज्वला भगत ही या भ्रष्टाचाराच्या खेळात सामील आहेत का ?तहसीलदार उज्वला भगत आणि प्रदीप मुकणे यांचे महिन्याची वसुली अंदाजे कोटीच्या आसपास आहे या भ्रष्टाचाराच्या खेळात प्रत्येक अधिकारी सामील आहे. तसेच प्रशासनामध्ये शिपाई पासून ते मंत्रालया पर्यंत काही भ्रष्ट अधिकारी आहे . त्यांना त्यांच्या वरिष्ठांना लाचेची रक्कम पोहोचवावी लागते. यामुळे त्यांना लाच घेतल्याशिवाय पर्यायच नसतो. मात्र पकडला जातो तेव्हा तो एकटा बळी पडतो. तसेच बळी पकडलेला अधिकारी वा कर्मचारी कधी ही वरिष्ठांचे नाव घेत नाही.
शशिकांत पडवळे यांना वाडा येथे ही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. भूमाफियांकडून शशिकांत पडवळे यांनी प्रचंड वसुली करून अंदाजे कोटी रुपये कमविले असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाई करावी. तसेच भ्रष्टाचाराच्या या खेळात आणखी कोण कोण सामील आहेत याची कसून चौकशी करावी.
