

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर च्या वतीने आज विविध उपक्रम राबविण्यात आले.
- सकाळी विक्रमगड येथे अमृतमहोत्सवी दौड आयोजित करण्यात आली होती. सदर ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांचेवतीने सहभाग घेण्यात आला होता.
- सदर ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर व जिल्ह्य़ातील इतर शासकीय विभाग व विविध शाळांतील विद्यार्थी व शिक्षक यांना भ्रष्टाचार विरोधी शपथ देण्यात आली. व कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक नागरिकास समाजातील विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार निर्मूलनात त्यांची भुमिका काय असायला हवी याबाबत मार्गदर्शन करण्यात आला
- विक्रमगड हायस्कूल व भारती विद्यापीठ हायस्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले.
- विविध ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी पत्रकांचे वाटप करुन तसेच शासकीय कार्यालयात भित्तीपत्रके लावुन भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यात आली.
- भारती विद्यापीठ हायस्कूल येथे ला.प्र.वि.पालघर यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.
- भारती विद्यापीठ हायस्कूल येथील शिक्षक व विद्यार्थी यांना भ्रष्टाचार विरोधी माहीती देऊन जनजागृती केली.