लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या – ३२३१-ए ३ ह्या जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्स व लिओ क्लब ऑफ वसई पर्ल्स ह्यांचा पद्ग्रहण समारंभ नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे लायन उमेश गांधी – माजी जिल्हा गव्हर्नर ह्यांनी पदाची शपथ दिली. ह्या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की लायन्स क्लब ही १४ लाख सेवाभावी कार्यकर्त्यांची जगातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून आपणास गोर गरिबांची व गरजूंची सेवा करता येते. या वेळी लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्सचे अध्यक्ष म्हणून लायन यशवंत जाधव व लिओ क्लब ऑफ वसई पर्ल्सचे अध्यक्ष म्हणून लिओ करण रेळे ह्यांची नेमणूक झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन अक्षया जाधव ह्यांनी केले. माजी अध्यक्ष लायन ललित शिंगरे ह्यांनी मागील वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला व करोना काळात ही सगळ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. येणाऱ्या वर्षात ग्रामीण भागात शिक्षण व आरोग्य सेवा तसेच मधुमेह , डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया असे उपक्रम राबविले जातील असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष लायन यशवंत जाधव ह्यांनी केले.

दरम्यान लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ वसई पर्ल्स ह्यांनी दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी कामण येथील अण्णासाहेब धामणे आश्रम शाळेत विद्यार्थीनींसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. डॉ. उमाकांत चव्हाण मेमोरियल ट्रस्ट, विरार ह्यांनी ह्या कामी सहकार्य केले. तारापोर, तलासरी, बोईसर, उंबरगाव पाडा व परिसरातील ६७५ विध्यार्थी ह्या आश्रम शाळेत आहेत. त्या पैकी जवळपास ५०० विद्यार्थी आदिवासी कुटुंबातील आहेत. घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने इथे ५२० राहतात. जवळपास १४० मुलींची आरोग्य तपासणी व चांगल्या आरोग्य सवयी बाबत समुपदेशन करण्यात आले. आवश्यकतेनुसार बऱ्याच विद्यार्थिनींना पूर्ण महिन्याची औषधे देण्यात आली. काही आजारी मुलांचीही तपासणी करून औषधे देण्यात आली. शाळेकरिता प्राथमिक उपचारासाठी औषधे देण्यात आली. लायन डॉ. अनुप्रिता पेडणेकर ह्यांनी सर्व मुलींना उत्कृष्ठ समपूदेशन केले व चांगल्या आरोग्य सवयी बद्दल मार्गदर्शन केले. डॉ. अनिरुद्ध चव्हाण, डॉ. माधवी चौधरी ( स्त्रीरोग तज्ञ) व लायन डॉ. अजय पेडणेकर ह्यांचे ही सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लायन वर्षा मोदगेकर व सर्व लिओ ह्यांनी बरीच मेहनत घेतली.

लायन क्लबने तिल्हेरच्या आदिवासी विभागातील शाळांमध्ये सेवा दिली. दिनांक ६ ऑगस्ट, २०२२ रोजी सरस्वती माध्यमिक विद्यालय , तिल्हेर येथे जवळपास ४२५ विद्यार्थ्यांना १३५० वह्यांचे वाटप केले. ह्या वह्या ऐन जी वर्तक हायस्कूल, विरारच्या डॉ. रावत मॅडम ह्यांनी भेट दिल्या होत्या. १० वीच्या काही विद्यार्थिनींना शालेय पुस्तके भेट देण्यात आली. तसेच वरथा पाडा व जाधव पाडा येथील शाळेत सिलिंग फॅन्स भेट देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *