प्रवासी संघटना रिक्षा संघटना , आरटीओ व वाहतूक विभाग यांच्यात चर्चा संपन्न

वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना विरार यांनी रिक्षा भाडे वाढ विरुद्ध 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर पासून रिक्षा मध्ये प्रवास करण्यावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी वसई वाहतूक विभाग व प्रवासी संघटना , ऑटोरिक्षा महासंघ यांच्यामध्ये दिनांक 29 नोव्हे 2021 रोजी उपप्रादेशिक अधिकारी वसई यांच्या दालनात बैठक संपन्न झाली .या चर्चेला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुळे वाहतूक पोलीस निरीक्षक परिमंडळ दोन वसई शेखर डोंबे, वाहतूक पोलीस निरीक्षक परिमंडळ तीन विरार चे दादाराम कारंडे, प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जड्यार, उपाध्यक्ष अनिल मोरे ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे अध्यक्ष विजय खतले माजी अध्यक्ष मधुसूदन राणे सदस्य शरद जळगावकर सचिव महेश कदम सदस्य विजय मिश्रा ,उपाध्यक्ष आरवींद्र पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदरची चर्चा अत्यंत सकारात्मक होऊन रिक्षा संघटना व प्रवासी संघटना यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला कोरोणा पूर्वी जे भाडे आकारले जात होते त्याच पद्धतीने यापुढे रिक्षा भाडे आकारले जावे असे ठरले .सध्या रिक्षा भाडेवाढ करण्यात आली नसून सदरचा प्रस्ताव हा विचाराधीन आहे याबाबत लवकरच सर्वे करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी सांगितले लॉक डाऊन मध्ये संपूर्ण रिक्षा बंद होत्या त्यानंतर टप्प्याटप्प्याने रिक्षा व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली. अनेक चाचण्या, परीक्षांना सामोरे जाऊन रिक्षा चालकांना रिक्षा चालवाव्या लागल्या covid-19 काळाच्या महामारी मध्ये देखील रिक्षाचालकांनी प्रवाशांना दवाखान्यांमध्ये पोहोचवणे तपासण्या करण्यासाठी दवाखान्यात ने-आण करणे अशा विविध सेवा पुरविल्या यामध्ये अनेक रिक्षा चालकांना आपला लाख मोलाचा जीव गमवावा लागला होता. नंतर अनलॉक पद्धत सुरू झाली टाळेबंदी उठल्यानंतर हळू हळू प्रत्येक क्षेत्रातील घटकाला मोकळीक देण्यात आली मात्र रिक्षा मध्ये दोनच प्रवासी बसवून प्रवास करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले होते. त्या अनुषंगाने रिक्षामध्ये दोन प्रवासी भरून तिसऱ्या प्रवाशाचे भाडे दोन प्रवाशांमध्ये विभागून द्यायचे ठरले होते .त्या अनुषंगाने आज पर्यंत रिक्षा चालक भाडे आकारत होते. मात्र प्रवाशांना व नागरिकांना मोकळीक दिल्याने रिक्षामध्ये तीन व चार प्रवासी बसू लागले मात्र भाडे वाढीव दराने घेऊ लागल्याने प्रवासी व रिक्षा चालकांमध्ये दररोजचे खटके उडत होते असा आरोप प्रवासी संघटनेने केला होता याबाबत प्रवासी संघटनेने समाज माध्यमांतून बेकायदेशीर रिक्षाभाडे वाडी संदर्भात आवाज आला होता व 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर रिक्षा न बसून रिक्षा प्रवासावर बहिष्कार टाकून आपला निषेध नोंदवला होता याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी प्रवासी संघटना, रिक्षा संघटना यांचे प्रतिनिधी, वाहतूक पोलीस विभाग यांना त चर्चेसाठी बोलावून घेतले होते त्या अनुषंगाने या विषयावर प्रवासी व रिक्षा संघटनांची बाजू ऐकण्यात आली .प्रवासी संघटनेने म्हटल्याप्रमाणे टाळे बंदी नंतर दोन प्रवासी घेत होते तोपर्यंत ठीक होते मात्र तरीदेखील ते प्रवाशांना परवडण्यासारखे नव्हते परंतु त्यानंतर रिक्षाचालकांनी तीन ते चार प्रवासी घेण्यास सुरुवात केली व रिक्षाभाडे मात्र कमी केले नाही. रिक्षा चालक वाढीव भाडे चार जणांकडून घेत होते. त्यामुळे सर्वसामान्य कामगार व मजुरवर्गाला हे भाडे परवडेनासे झाले .मुळात अल्प पगारामध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना हे वाढीव रिक्षाभाडे न परवडण्यासारखे होते. प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे अनेक दिवस प्रवाशांमध्ये रोष खदखदत होता प्रवासी संघटनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई यांना रिक्षा भाडेवाढ कमी करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई यांनी सर्व घटकातील प्रतिनिधींना बोलावून त्यांच्याशी सविस्तर व कायदेशीर चर्चा केली व टाळे बंदी पूर्वी जे रिक्षा भाडे भाडे आकारले जात होते त्याच पद्धतीने तीन प्रवाशांचे भाडे आकारून रिक्षा व्यवसाय करावा त्यामुळे प्रवाशांवर जास्त बोजा येणार नाही व रिक्षा चालकांना देखील त्यांचा व्यवसाय वरती परिणाम होणार नाही. याबाबत प्रवासी संघटना, रिक्षा संघटना यांनी सहमती दर्शवली त्यानुषंगाने एक डिसेंबर 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर पासून तालुक्यातील सर्व शिक्षकांनी पूर्वीप्रमाणेच रिक्षाभाडे घ्यावे व तीन प्रवासी वाहतूक करावी असे आवाहन ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक महासंघाचे अध्यक्ष विजय घेतले यांनी सर्व रिक्षा चालकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *