पालघर दि 12 : लोकन्यायालयाच्या माध्यमातून अधिक काळापासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेले दावे, तसेच दखलपूर्व 810 दावे निकालात काढण्यात आले आहेत
अपर जिल्हा व सत्र न्यायालय, पालघर येथे लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकन्यायालयाच्या माध्यमातून काही काळापासून निकालाच्या प्रतिक्षेत असलेले दावे 460
तसेच दाखलपुर्व दावे 350 असे एकूण 810 दावे निकालात काढण्यात आले आहेत.
दीर्घकाळ निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या दाव्या मध्ये चेंक बाउन्सच्या केसेस, डोमेस्टिक व्हायलन्स,, विवाह याचिका, मोटार अपघात, प्राधिकरणानाकडील दावे , दिवाणी दावे निकाली काढण्यात आले.
तसेच दाखलपुर्व प्रकरणांमध्ये ग्रामपंचायतीचे पाणीपट्टी व घरपट्टी याची थकबाकी व बॅंक, विज वितरण कंपनी चे दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आले. मा. विधी सेवा प्राधिकरण, ठाणे व मा.विधी सेवा,पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने व मा.जिल्हा न्यायाधीश तथा पालघर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष, डी. एच. केळुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पॅनल प्रमुखांनी लोकन्यायालयाचे कामकाज पाहिले.या मध्ये
पालघरचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस.डी.दाभाडे,
. सर्वश्री सहदिवाणी न्यायाधीश ए.ए. चेंडके,
.श्री.खंदारे
श्रीमती एक.ए.काळे,
श्रीमती . एस.एच.तेलगांवकर यांचा समवेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *