
(वसई: प्रतिनिधी) लोक आधार संघटना महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष हनुमान देवकर यांना जीवे मारण्याची धमकी काही महिन्या पासून देण्यात येत आहेत. ते इंदिरा वसाहत, पेल्हार इथे कित्येक वर्षांपासून राहत आले आहेत. ते वडार समाजाचे असून बहुजन समाजामध्ये कार्यरत आहेत. गेल्या किती तरी वर्षांपासून ते समाज कार्य करीत आले आहेत. समाजासाठी सेवा करणे काही परप्रांतीय आणि जातीय वादी लोकांना त्याचे हे कार्य रुचत नसल्याने त्यांना सामाजिक काम न करण्यासाठी जीवे मारण्याच्या धमक्या येत असतात.
राहुल झा, त्यांचे तीन साथीदार राकेश, चिन्या, अखिलेश हे राहणारे इंदिरा नगर वसाहत, पेल्हार येते राहतात. ते हनुमंत यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र रचून नेहमी धमकी देत असतात. त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट होऊ नये या साठी त्यांनी मीरा भाईदर वसई. विरार आयुक्तलंय,पोलीस, पोलीस उपायुक्त झोन -2, सह आयुक्त पोलीस (तुलिंज) या ठिकाणी लेखी तक्रार दाखल केली आहे. हनुमंत यांच्या म्हणण्या नुसार संबंधीतावर लवकरात लवकर गुन्ह्याच्या तपास करून कारवाई करण्यात यावी आणि त्यांना योग्य तो न्याय मिळून द्यावा.

