

वंचित बहुजन आघाडीचे नालासोपारा ,बोईसर आणि वसई विधानसभा क्षेत्रात उमेदवार उभे असताना आज वंचित आघाडीला सर्वात मोठा धक्का बहुजन विकास आघाडिकडुन देण्यात आलेला आहे भारीप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीचे वसई विरार शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा. मंगेश वाघमारे यांनी आपल्या शेकडो समर्थक पदाधिकार्यांसह आज शनिवार दि. १२ऑक्टोंबर रोजी नालासोपारा विधानसभेचे आ.क्षितिज ठाकुर यांच्या हस्ते बहुजन विकास आघाडित प्रवेश केला. यावेळि प्रामुख्याने मा. महापौर रुपेश जाधव , नगरसेवक राजेश ढगे , रिपाइं पालघर जिल्हाध्यक्ष गिरिश दिवाणजी , नविन वाघचौडे उपस्थित होते
मा. लोकनेते आ. हितेंद्र ठाकुर यांनि वसई तालुक्यातिल बौद्ध व इतर समाजाला भरभरुन दिले आहे. आप्पांचे विचार हे छत्रपती शिवराय , फुले शाहु आंबेडकरांच्या समतावादि विचाराला सुसंगत असुन त्यामुळे वसईतिल तिनहि मतदारसंघात आंबेडकरि समाजाच्या मतांची विभागणी होऊन हिंदुत्ववादि पक्षांचे लोक या वसई तालुक्यात तरि निवडुन येऊ नये म्हणून बहुजन विकास आघाडिला थेट पाठिंबा देण्यासाठि मी बहुजन विकास आघाडित प्रवेश करित असल्याचे मंगेश वाघमारे यांनि सांगितले.
मंगेश वाघमारे यांचा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंबेडकरी समाजात जनसंपर्क दांडगा असल्याने याचा फायदा नक्किच बहुजन विकास आघाडिला या निवडणुकित होईल.