आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सर्वच्या सर्व २८८ जागा लढवणार असल्याची घोषणा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केली.दरम्यान जागावाटपा संदर्भात एम आय एम बरोबर बोलणे सुरु असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले, आज सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत आमची आघाडी २८८ जागा लढवणार असून येत्या दोन ते तीन दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाणार का? या प्रश्नांवर त्यांनी आम्ही राज्यातील सर्व जागा लढवणार असल्याचे निक्षून सांगितले.यावेळी बोलताना ऍड. आंबेडकर म्हणाले की सध्या भारतात विजेचा तुटवडा नाही राष्ट्रीय आयोगाच्या अहवालानुसार अगदी पीक लोडला पुरेल एवढा वीजपुरवठा आता होत आहे.

त्यामुळे या पाण्याचा उपयोग वीज निर्मिती व्यतिरिक्त फारशा प्रमाणावर पिण्यासाठी किंवा शेतीसाठी होत नाही ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरणे हे सार्वजनिक हिताचे आहे टाटाच्या सहा धरणातून वीज निर्माण करण्याऐवजी ते पाणी पिण्यासाठी शेतीला वापरावे अशी मागणी ऍड. आंबेडकर यांनी केली.पाण्याऐवजी पवन ऊर्जा ऊर्जा सौर ऊर्जा असे अनेक स्त्रोत विजय साठी उपलब्ध आहेत. वंचित आघाडीची सत्ता आल्यानंतर टप्प्याटप्प्याने याची अंमलबजावणी करणार असल्याचे आंबेडकर म्हणाले त्याचबरोबर पाण्याचे समन्यायी वाटप म्हणजे कोरडवाहू पिकासाठी संरक्षण देणाऱ्या पाणीवाटप आला आणि पिकांसाठी पाणीपुरवठ्याला आमचे प्राधान्य राहील असे अॅड प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *