

प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एफ हद्दीत खैरपाडा येथे माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांनी प्रचंड अनधिकृत बांधकामे केली असून सदरची अनधिकृत बांधकामे निष्कासित करून एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा.
याबाबतची अधिक माहिती अशी की,
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एफ हद्दीत खैरपाडा येथे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांनी प्रचंड अनधिकृत बांधकामे केली आहेत. एक लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकाम करतो आणि महानगरपालिका सदर प्रकरणी कोणतीही कारवाई करीत नाही. यावरून महानगरपालिकेचे किती भयंकर प्रमाणात अंदाधुंद कामकाज चाललेले आहे हे निदर्शनास येते. कायदाकानून धाब्यावर बसवून भूमाफिया लाच देऊन अगदी बिनधास्त अनधिकृत बांधकामे करतात.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरुद्ध आवाज उठविला होता. आणि दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक स्वतः अनधिकृत बांधकामे करतात. याबाबत अविनाश जाधव यांची भूमिका काय?
प्रभाग समिती एफ चे सहाय्यक आयुक्त राजेंद्र कदम यांनी त्वरित खैरपाडा येथील प्रफुल्ल पाटील यांच्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करावी व एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत.