

भारतात मोठ्या संख्येने बंजारा समाज पसरलेला आहे महाराष्ट्र,राजस्थान,हिमालय,
आंध्रप्रदेश, कर्नाटक,उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश, या राज्यात मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज वास्तव्य करीत आहे बंजारा समाजाचे आध्यात्मिक गुरू संत सेवालाल महाराजांची जयंती 15 फेब्रुवारी रोजी भारतभर साजरी करण्यात आली आहे. संत सेवालाल महाराजांची समाधीस्थळ वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आहे पोहरादेवी या गावाला बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाते भारतातून संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी व बंजारा बांधव दर्शन घेण्यासाठी येत असतात मागील 5 वर्षापासून संत सेवालाल महाराज जयंती महाराष्ट्र मोठ्या जलोष्यात साजरी करतात.काल पालघर जिल्ह्यातील वसई गाव येथे बंजारा विकास मंडळ पुरस्कृत समस्त बंजारा समाज,वसई यांनी संत सेवालाल महाराजांची 281 वी जयंती मोठ्या उत्साहात केले यावेळी प्रमूख पाहुणे वसई विरार महानगरपालिका चे महापौर प्रविण शेट्टी यांच्या हस्ते दिप प्रवज्यनल व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले व संत सेवालाल महाराजांना भोग लावलं, हरदास बोलून कार्यक्रमाला सुरुवात केले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित प्रभाग समिती आय चे सभापती लॅरेन्स डायस, राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे पालघर जिल्हा अध्यक्ष रवी राठोड,पत्रकार वैभव पाटील,पत्रकार ऋषिकेश जाधव,जेष्ठ समाजसेवक किशोर चव्हाण,समाजसेवक सुरेश चव्हाण,समाजसेविका सुरेखाताई राठोड,पोलीस दिलीप राठोड, वरिष्ट लिपिक विनोद पवार,इ मान्यवरांच्या उपस्थितीत
विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे आयोजन कवी आनंद चव्हाण,पत्रकार मच्छिंद्र चव्हाण, विलास जाधव,विजय चव्हाण, दिनेश राठोड,युवराज पवार,किशोर पवार,धनराज पवार,अमरसिंह चव्हाण,पप्पू जाधव,दिनेश पवार व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केले

Great content! Super high-quality! Keep it up! 🙂