
◆ रानगाव येथील भाजपा कार्यालयाचे श्याम पाटकर व उत्तम कुमार यांच्या हस्ते उदघाटन!

वसई (रानगाव) : भारतीय जनता पार्टीची वसई-विरारमध्ये घौडदौड दिमाखात चालू असून भाजपा चे रानगाव येथे एक नविन कार्यालय भाजपा वरिष्ठ नेते श्याम पाटकर व भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या हस्ते फित कापून उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे आयोजन रानगाव ग्राम पंचायतचे अध्यक्ष अजित घरत व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.
उत्तम कुमार यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, वसईची ओळख ही यापूर्वी चिमाजी अप्पांची भूमी तसेच आदी शंकराचार्य यांच्या पदस्पर्शाने पावन भूमी म्हणून होती ती ओळख आज विरार कंपनी नावाने ओळखली जाते हे अतिशय खेद जनक आहे. बहुजन विकास आघाडीचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपण मागील 10 वर्षांपासून येथे भाजपाची सत्ता टिकवली आहे व विकास करत आहात हे नक्कीच वाखण्याजोगे आहे. असे यावेळी ते म्हणाले.
श्याम पाटकर यांनी यावेळी बोलताना, कार्यालय दररोज सुरू राहीले पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. येथे आलेला प्रत्येक गरजू हा एका अपेक्षेने येतो त्याचे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून होईल अशी मला आशा आहे असे यावेळी ते म्हणाले.
यावेळी वसई-विरार महासचिव महेंद्र पाटील, वसई पश्चिम मंडळाचे अध्यक्ष कपिल म्हात्रे, रानगावच्या सरपंच नीलिमा मेहेर, उपसरपंच जितेंद्र मेहेर, आशिष जोशी, अमर मेहेर, देवदत्त मेहेर तसेच कार्यकारिणी कमिटी, अजित घरत, सुनील घरत, विनोद मेहेर, दयानंद घरत, देवानंद घरत यावेळी सोबत वसई रोड मंडळाचे अध्यक्ष रामानुजम, सरचिटणीस गोपाळ परब, रमेश पांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.