२१ एप्रिलनंतर वीजपुरवठा पूर्ववत होणार

अधीक्षक अभियंता संजय खंदारे यांची माहिती

नालासोपारा :- वसई तालुक्यात गेले काही दिवस अघोषित लोडशेडिंग सुरू असून कोणत्याही वेळी वीज जाण्याने नागरिक हैराण आहेत. त्यातच वाढलेली उष्णता, यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन, भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांच्या सोबत प्रमुख पदाधिकारी नंदकुमार महाजन, कपिल म्हात्रे, बाळा सावंत, शेमल आजागिया यांनी महावितरणचे वसई मंडळ अधीक्षक अभियंता संजय खंदारे यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत झालेल्या चर्चेत तारापुर बोईसर येथे सुरू असलेल्या महापारेषणच्या कामामुळे वसईला येणार्‍या दोन वाहिन्यापैकी एक वाहिनी बंद असल्याने वीज पुरवठा कमी झाला असून २१ एप्रिलपर्यंत काम पूर्ण होऊन वीज पुरवठा सुरळीत होईल व सुरू असलेले भारनियमन बंद होईल असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *