


प्रतिनिधी : गुरूवार दि. ११ जूलै २०१९ रोजी दिली येथे माजी लोकसभा अध्यक्ष दिल्ली संसद भवन मिरा कुमारी यांच्या हस्ते देण्यात आला. सदर कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब, पूर्व संसद ग्यानेचंड गौतम, दिल्ली पार्षद कुमारी रिंकू, राष्ट्रीय दलीत साहित्य अकादमीचे अध्यक्ष मनोज कुमार, ज्येष्ठ पार्षाड टी.अम. कुमार, बाबू जगजीवनराम कला, संस्कृती दलीत साहित्य अकादमी अध्यक्ष डॉ नफेसिग खोबा, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास आबनावे, बाळकृष्ण कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
मा. चेतन हेमंत भोईर व महेश जाधव हे वसई तालुक्यातील रहिवासी आहेत ते सध्या सामाजिक काम करत आहेत. लहान पणापासून सामाजिक कार्यात ते नेहमी पुढाकार घेत आहेत. चेतन भोईर हे सध्या वसई नऊगाव पश्चिम येथील भिम प्रेरणा जागृती संघ वसई तालुका पश्चिम विभाग यांचे अध्यक्ष पदावर विराजमान आहेतआणि महेश जाधव हे सल्लागार आहेत. त्यांनी सामाजिक बांधिलकी नेहमी जपली आहे. अनेक लोकांना रुग्णालय मदत, विद्यार्थांना शैशाणिक मदत,आंदोलन, मोर्चा, संप आणि बंद तसेच महापुरुषांच्या जयंती उत्सव रॅली आणि सामाजिक उपक्रमात चेतन भोईर व महेश जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. २०१३ मध्ये देखील चेतन भोईर याना दिल्ली येथे दलीत साहित्य अकादमी तर्फे बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार २०१३ हा अवार्ड प्राप्त झाला होता. तसेच तब्बल ६ वर्षा नंतर देखील पुन्हा त्यांचे नाव दिल्ली येथे बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार २०१९ हा पुरस्कारासाठी जाहीर झाल होते आणि त्यांना ११ जुलै २०१९ ला दिल्ली येथे पुरस्कार देण्यात आला. चेतन भोईर व महेश जाधव हे तरुण वयात सर्व युवकांसाठी एक नवा आदर्श बनत आहेत असे म्हणण्यास काही वावगे ठरणार नाही. अशा आमच्या वसई येथील या सुपुत्राला सर्व नागरिकांनाकडून खूप खुप शुभेच्छा.