वसईच्या गिरीज धर्मग्रामातील सौ . वीणा विराज आल्मेडा यांनी क्वीन ऑफ एशिया इंटरनॅशनल पेजेंट 2021 ( QUEEN OF ASIA INTERNATIONAL 2021 ) मध्ये मिसेस एशिया कॉन्टिनेन्ट क्वीनचा ( MRS ASIA CONTINENT QUEEN ) प्रतिष्ठित मुकुट जिंकल्यामुळे वसईच्या लोकांना पुन्हा एकदा तिचा अभिमान वाटत आहे . भारतीय विवाहित महिलेचे सौंदर्य प्रतिभा आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी असलेल्या मोठ्या व्यासपीठ आणि रंगमंचावर हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
सौ . वीणा विराज आल्मेडा यांना 0३ ऑक्टोबर २०२१ रोजी नुकत्याच नेल्सन मंडेला शांती पुरस्कार प्राप्त झालेल्या डॉ. किशोर नवनदार ( चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ ब्लू बिलियन ग्रूप ) यांच्याहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा मुकुट घातला गेला.
मॉरिशसमध्ये आयोजित केलेल्या मिसेस युनिव्हर्स पेजेंट २०१९ मध्ये त्या चॅरिटी क्वीन , मिसेस इंडिया, युनिव्हर्स महाराष्ट्र आणि वुमन ऑफ सबस्टन्स २०१९ च्या प्राप्तकर्त्या आहेत . सौ. वीणा या सध्या ‘सेंट लॉरेन्स हायस्कूल मध्ये मुख्याध्यापिका असून त्यांना मुलांच्या आणि महिलांच्या कल्याणासाठी काम करण्याची आवड आहे.
सौ. वीणा विराज आल्मेडा म्हणतात की क्वीन ऑफ एशिया इंटरनॅशनल सारख्या स्पर्धेत महिलांना त्यांचे वैयक्तिक आणि सर्वोत्तम ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास विकसित करण्याचे सामर्थ्य मिळते .एक आत्मविश्वासू महिला किती तरी बदल घडवून आणू शकते .त्या पुढे म्हणतात की हे सन्मान त्यांना अशी आठवण करून देतात की आपल्या समाजातील मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी त्यांचे कार्य चालू ठेवून बदल घडवून आणण्याची मोठी जबाबदारी आता त्यांच्यावर येऊन पडली आहे .वंचित मुलांच्या विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न गरजूंच्या वैद्यकीय उपचारांसाठी धर्मादाय कार्य आणि महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग या विषयी जागरूकता आणणारे कार्यक्रम घडवून आणल्यामुळे वसई तालुक्यातील विविध प्राधिकरण यांनी त्यांची प्रशंसा केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *