
विरार(प्रतिनिधी) : कोविड-१९च्या संक्रमण संकटात वसई-कोळीवाड़ा येथील अबुबकर मशिदीने मानवतेचा धर्म जपत दररोज दीडशेहून अधिक गरजवंतांना मोफत अन्नदान करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे. १६ जुलैपासून अबुबकर मशिदीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे.
कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘लॉकड़ाउन’ घेण्यात आला आहे. उत्तरोत्तर वाढत जाणारा लॉकडाउन व कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे सामान्य आणि गरोगरीब नागरिकांवर कोरोनासोबतच उपासमारीचे संकट ओढवले आहे.
अशा बिकटप्रसंगी मानवतेचा धर्म म्हणून वसई-कोळीवाड़ा येथील अबुबकर मशिदीने दररोज अन्नदान करण्याचा निर्णय घेतला असून; या उपक्रमांतर्गत दररोज दीडशे गरजवंतांना मोफत अन्नदान केले जात आहे. १६ जुलैपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा आतापर्यंत हजारो लोकांनी लाभ घेतला आहे.