

वसई(प्रतिनिधी):वसईतील अंबाडी रोड पंचवटी नाक्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. मागील बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ व्या जयंतीनिमित्त आणि वसईतील जनतेच्या मागिणीतून वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर (आप्पा) यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात उभारणी करण्यात आली होती. मात्र आज तेच चौक मागील सहा महिन्यांपासून स्वतःच्या डागडुगीच्या प्रतीक्षेत आहे. हे आंबेडकर चौक वसईतील आंबेडकरी जनतेचे गौरवशाली प्रतीक आहे.ह्या चौकातच दर वर्षी २६ जानेवारी १५ ऑगस्ट रोजी आंबेडकरी आणि स्थानिक जनतेकडून ध्वजारोहन केले जाते.आणि त्याच बरोबर वसईतील बौद्धाची एकमेव मोठी संघटना सिद्धार्थ जागृती संघटनेची १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची भव्य मिरवणूक ह्याच चौकात मेणबत्ती पेटून हार फुले वाहून चौकात नतमस्तक होऊनच पुढे मार्गिस्त होते. हा चौक ऐवढा संवेदनशील असून सुद्धा स्थानिक महानगरपालिका याकडे असे दुर्लक्ष करीत असल्याने आंबेडकरी जनतेत आश्चर्य आणि राग वेक्त होत आहे. आत्ता ह्यासाठी कोणी प्रयत्न केले नाही असे ही नाही. वसईतील माणिकपूर महानगरपालिकेचे सह-आयुक्त गिल्सन यांना मी वसई संस्कृती साप्ताहिक संचालक , संपादक अशोक वाघमारे आणि वसईतील शिव सेना पक्षाचे युवा कार्यकर्ते सुशांत धुळप यांनी ही पत्रव्यवहार केलेला आहे. तरी सह-आयुक्त जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत हे सिद्ध होत आहे. मला ह्या प्रकरणी सह-आयुक्त गिल्सन हे आंबेडकरी जनतेची परीक्षा पाहत असावेत असे वाटते. नाहीतर त्यांनी आंबेडकर चौकाबाबत एवढी नकारात्मक भूमिका घेतली नसती. सद्या शहरात लॉक डाऊन पूर्णपणे हटलेला आहे. तरी महानगरपालिकेने लवकरात लवकर ह्या आंबेडकर चौकाची दुरुस्ती करावी अन्यथा वसईतील तमाम आंबेडकरी जनतेला आणि आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षाला एकत्र करून महानगरपालिके विरोधात आणि सह-आयुक्त गील्सन विरोधात एक मोठे आंदोलन उभे करावे लागेल. त्यातुन उद्भवणाऱ्या प्रसंगास सह-आयुक्त गिल्ससन आणि वसई विरार शहर महानगरपालिका जवाबदार असेल