

वसई : (प्रतिनिधी) : वसई पश्चिमेतील माणिकपूर येथील एमआय मोबाईलचे शोरूम अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे 3 ते चार वाजताच्या सुमारास फोडले. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल लंपास करून पोबारा केला. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असून याप्रकरणी माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरप्रकरणी पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे चोरटे दुकानात दरोडा टाकत असताना येथून नागरिकांची ये-जा चालू होती. मात्र त्याची कानखूनही त्या नागरिकांना लागली नाही. सुरूवातीला दुकानाभोवती लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यावर स्पे फवारून नंतर दुकानासमोर प्लॅस्टीकचे कापड धरून चोरट्यांनी कोणाला दिसू नये अशा हेतूने दुकानात प्रवेश केला. या घटनेत चोरट्यांनी 20 एमआय कंपनीचे मोबाईल चोरून पोबारा केला आहे. मोबाईल चोरताना मोबाईलचे बॉक्स दुकानातच टाकून चोरट्यांनी पोबारा केला आहे.