मंडळ अधिकाऱ्यांचे निष्कासनाचे आदेश फाट्यावर ! कारवाई होणार ?


Anc :- वसईतील सत्पाळा येथील क्षितिज रिसॉर्टचे बांधकाम अनधिकृतपणे शासकीय जागेत केलेले असल्याने सदर बांधकाम निष्कसनाचे आदेश तहसीलदार महसूल विभागाला प्राप्त झालेले असतानाही संबंधित महसूल विभागाचे अधिकारी या रिसॉर्टच्या बांधकाम पाडण्यास टाळाटाळ करीत असल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे.त्यामुळे शासन निर्णयाची पायम्मली होत असल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार,मौजे सत्पाळा येथील स.नं/ही.नं ८७ या शासकीय जागेत क्षितिज रिसॉर्टचे बांधकाम अनधिकृतपणे उभारण्यात आले आहे.दरम्यान सदर अवैधपणे उभारलेले बांधकाम निष्कासनाचे आदेश आगाशी मंडळ अधिकारी यांनी ३० जुलै २०२४ रोजी महसूल विभागाला दिले आहेत.त्यानुषंगाने ११ फेब्रुवारी २०२५ रोजी बांधकाम निष्कासनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.परंतु असे असतानाही महसूल अधिकाऱ्यांनी क्षितिज रिसॉर्टची प्रत्यक्ष पाहणी करूनही सदर ठिकाणी बांधकाम निष्कासनाची कारवाई केलेली नाही.त्यामुळे सदर बांधकामात क्षितिज रिसॉर्टच्या मालकासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक साटेलोटे असल्याची उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.तसेच या बांधकामावर तोडक कारवाई होणार का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात असून या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *