

◆ खासदार राजेंद्र गावितांनी केले आवाहन
वसई : खासदार राजेंद्र गावित यांनी वसईतील गरजू रुग्णांना मदत हवी असल्यास भाजपा वसई रोड कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. प्रधानमंत्री राहत कोश योजनेच्या माध्यमातून ही मदत केली जाईल असे ते म्हणाले. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाकडून ठेवलेल्या कार्यक्रमात खासदार राजेंद्र गावित यांनी जमलेल्या समुदायास संबोधित करताना ते म्हणाले.
प्रधानमंत्री निधी मधून आतापर्यंत खासदार गावित यांच्या माध्यमातून भाजपा वसई रोड मंडळातील आता पर्यंत 10 गरजू रुग्णनांना मदत झाली आहे व अशीच मदत त्यांच्याकडून होत रहावी हीच इच्छा अपेक्षा आहे असे यावेळी भाजपा वसई रोड मंडळ अध्यक्ष उत्तम कुमार म्हणाले. कोणीही गरजू रूग्ण असल्यास त्यांनी योग्य कागदपत्रांसह भाजपा वसई रोड कार्यालयाशी संपर्क साधावा असे उत्तम कुमार (9323528197) यांनी यावेळी सांगितले आहे.