
● महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची मोर्चे बांधणी

वसई: वसई-विरार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जय्यत तयारी चालू आहे. भाजपा वसई-विरारकडून जिल्हाध्यक्ष राजन नाईक व महासचिव उत्तम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्याप्रमाणात वसईत मोर्चेबांधणी केली जात आहे. भाजपाचे वसई-विरार मधील असलेल्या 6 मंडळांच्यामाध्यमातून दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन भाजपाकडून सुरू आहे.
याच प्रशिक्षण शिबिराच्या आढावा बैठकी दरम्यान वसईतील प्रसिद्ध वकील पी. एन. ओझा यांनी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. तसेच काही दिवसांपूर्वीच वकील साधना धुरी, बविआचे प्रमुख कार्यकर्ता संजय अचीपालिया, शिवसेनेचे कार्यकर्ते विनोद सकसेना व किशोर गुप्ता यांनी पक्षात प्रवेश केला होता. तसेच मागील महिन्याभरात अनेक लहान-मोठ्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. ज्यामध्ये खास करून अनेक युवा कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला आहे.
जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, सर्वांना सांभाळून घेणारे असे जिल्हाध्यक्ष रूपाने राजन नाईक यांचे नेतृत्व भाजपा वसई-विरार ला लाभले आहे. भाजपामध्ये होत असलेली ही इन्कामिंग महापालिकेचा निकाल काय असणार हे दाखवून देत आहे. असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हा महासचिव राजू म्हात्रे, महेंद्र पाटील, आम्रपाली साळवे, जिल्हा उपाध्यक्ष दत्त नर, शेखर धुरी, रामनुजम, मॅथ्यू कोलासो, अपर्णा पाटील, श्रीकुमारी मोहन, रमेश पांडे, गोपाळ परब आदी पदाधिकारी व मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.