◆ ४,७२,१२० रक्कमेचे बिल आकारून महिलेला केलं होते बंधक!

◆ कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या उपचाराच्या नावाखाली स्थानिक रुग्णालयात लावली जात आहेत भरमसाठ रक्कमांची बिले..

◆ वसई मधील प्लॅटिनम रुग्णालयाला कोरोनामुक्त झालेल्या महिलेला बंधक केल्याने मनसे झाली आक्रमक !

◆ पी.पी.ई. किट च्या नावाखाली होत असलेली लूट मनसेनी आणून दिली निदर्शनास!

 

वसई : कोरोना महामारीच्या संक्रमणचे वाढत्या संख्येने गरीब असो किंवा श्रीमंत दोघाचेही हाल होत आहेत. यामध्ये मध्यम वर्ग व गरीब कुटुंबाना जास्तीत जास्त फटका बसला आहे. कामधंदा सर्व कारभार बंद असल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
याच परिस्थितीत कोणी गरीब किंवा मध्यम वर्गीय कुटुंबातील एखादी व्यक्ती कोरोनाने संकर्मीत झाली तर त्या व्यक्तीसहित कुटुंबाला सुद्धा परिणाम भोगावे लागतात.
कोरोना सक्रमन झाले हे वेळीच निदान झाल्यानंतर त्या रुग्णास आइसोलेशन किंवा क़वारंटाइन मध्ये वेळीच उपचार झाल्यावर तो रुग्ण सुखरूप बरा होवून जावू शकतो परंतु प्रकृती चिंताजनक असेल तर काही रुग्णालयात अतिशय चिंताजनक सांगून रुग्ण व कुटुंबातील व्यक्तीना भरमसाठ बिल वाढवण्यासाठी घाबरवून सोडले जाते. अशा प्रकारचे आरोप नातेवाईकाकडून होत असल्याच्या तक्रारी
वारंवार समोर येत आहेत.
सूत्रांकडुन मिळालेल्या माहिती आधारे कोवीड १९ ला पूर्णपणे नष्ट करणारी लस किंवा औषध बनलेली नाही.
त्यामुळे भीती पोटी ज्या व्यक्ती पूर्वी पासुन कोणत्याही व्याधीपासून पिडीत आहेत आशा रुग्णाकडून भलेमोठे बिल आकारले जात आहे. विविध आजाराच्या नावावर मोठ्या रकमाची बिले आकारून रुग्णालये नागरिकांना खुप अडचणीत टाकत असल्याचे सूत्रांकडून समजते. रुग्णाचे कुटूंबिय आपले दाग-दागिने, प्रॉपर्टी गहाण किंवा विकण्याची नौबत आली आहे.
सूत्रांच्या अनुसार एक ताजी घटना समोर आली ती वसई मधील एक प्रतिष्ठित प्लेटिनम रुग्णालया संबधीची. १७ दिवस कोरोनावर उपचार घेत असलेली महिलेला शुक्रवारी १० तारखेला बिल भरू न शकल्याने डिस्चार्ज दिल्यानंतर सुद्धा थांबवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार आई.सी.यू. वार्ड मध्ये वेंटिलेटर सपोर्ट वर सुरुवातीला काही दिवस ठेवण्यात आले होते व प्रकृती स्थिर झाल्यानंतर सामान्य वॉर्ड मध्ये हलविण्यात आले होते. डिस्चार्जच्या दिवशी एकूण बिलाची रक्कम ₹ ४,७२,१२०/- सांगण्यात आली. यांवर महिलेच्या नातेवाईकानीं विचारणा केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने लावलेलं बिलामध्ये आई.सी.यू. बेड ची ७५०० प्रतिदिन व ६०००/-ची रक्कम फार्मेसी मध्ये १८ वेळा दर्शवण्यात आली होती व इमरजेंसी प्रोसिजर अंतर्गत व ६०००/-ची रक्कम ११ वेळा अधिक भार म्हणून दर्शवण्यात आली होती त्याशिवाय ६३,१३२/-फार्मेंसी चार्जेस वेगळे लावण्यात आले होते त्यामध्ये औषधे दाखवली आहेत. याशिवाय काहि छोटे छोटे चार्जेस पूर्ण बिलामध्ये दर्शवीण्यात आले होते. कुटुंबियांच्या सगण्यावरून असे कळते की बिलामध्ये विनाकारण गडबड करून जाणूनबुजून रक्कम वाढवून लावण्यात आले. यांवर कुटूंबियांनी बिल भरण्यास नकार दिला. डिस्चार्जपूर्वी ₹ २,४७,०००/- एवढी रक्कम भरण्यात आली होती. उर्वरित रक्कम भरण्यास मज्जाव केला जात होता त्याशिवाय रुग्णाला घरी सोडल जाणार नाही असे बजावले जात होतं. अशा वेळी कुटूंबियांनी स्थानिक मनसे नेत्याशी सम्पर्क करून मदतीसाठी प्रयत्न केला. स्थानिक मनसे नेता प्रवीण भोईर व राज नागरे आणि अन्य पदाधिकारी यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करुन सुद्धा रुग्णालय प्रशासन ऐकण्यास तयार नसल्याने अखेर मनसे स्टाईल बिल न भरता महिलेला रुग्णालयातुन बाहेर काढण्यात आले व कुटूंबियांसमवेत सुखरूप घरी सोडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *